आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायरस यांच्या कारचा फॉरेन्सिक रिपोर्ट:पुलाच्या चुकीच्या डिझाइनमुळे अपघात, सेफ्टी फीचर्स कार्यान्वित होते; सीटबेल्ट नसल्याने जीव गेला

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या कारला मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सूर्या नदीच्या पुलाच्या सदोष डिझाइनमुळे अपघात झाला. अपघाताची चौकशी करण्यासाठी दाखल झालेल्या IIT खरगपूरच्या फॉरेन्सिक टीमने हा अहवाल दिला आहे.

सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज GLC-220 कारची सर्व सुरक्षा कार्ये योग्य प्रकारे काम करत असल्याचे तपास पथकाला आढळून आले. अपघाताच्या वेळी एअरबॅगही उघडल्या होत्या, मात्र सीट बेल्ट न लावल्यामुळे या धडकेत सायरस मिस्त्री यांना गंभीर मार लागला आणि यातच त्यांचा जाग्यावरच मृत्यू झाला.

अहमदाबाद-मुंबई महामार्गावरील सूर्या नदीच्या पुलावर सायरस मिस्त्री यांची कार रस्ता दुभाजकावर (लाल वर्तुळात) आदळली होती.
अहमदाबाद-मुंबई महामार्गावरील सूर्या नदीच्या पुलावर सायरस मिस्त्री यांची कार रस्ता दुभाजकावर (लाल वर्तुळात) आदळली होती.

IIT खरगपूरच्या सात सदस्यीय फॉरेन्सिक टीमने हा तपास केला. या टीममध्ये दोन पीएचडी स्कॉलर, मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनीअर, अनुभवी क्रॅश तपास व्यावसायिक आणि सिम्युलेशनमध्ये स्पेशलायझेशन असलेले प्रत्येकी एक सदस्य सदस्य असा सात जणांचा समावेश होता. सेव्ह लाइफ फाऊंडेशनने सायरस मिस्त्री यांच्या कारच्या अपघाताची चौकशी करण्यासाठी ही टीम नेमली आहे.

टीमचा दावा - सायरस यांचे डोके कारच्या छताला धडकले
फॉरेन्सिक टीमच्या अहवालानुसार, मिस्त्री यांच्या शवविच्छेदनाच्या वेळी कारची स्थिती आणि अंतर्गत जखमांवरून कार सुसाट वेगाने जात असल्याचे दिसून येते. आमच्याकडे एक ठोस अहवाल आहे की मागच्या सीटवर बसलेले दोन्ही लोक (सायरस मिस्त्री आणि जहांगीर) यांनी सीट बेल्ट घातलेला नव्हता. दरम्यान, कार दुभाजकावर आदळल्याने दोघेही जोरात उडले गेले. त्यामुळे त्यांना गंभीर स्वरूपाचा मार लागला. त्यांची डोकी कारच्या छतावर आदळली. यामुळे त्यांच्या डोक्याला व शरीराच्या इतर भागांना जखमा झाल्या होत्या.

तपास पथकाने पुढे असेही सांगितले की, सायरस मिस्त्री आणि त्यांचे मित्र जहांगीर यांनी सीट बेल्ट घातला असता तर अशा अपघातात त्यांच्या शरीरावर जखमा झाल्या नसत्या. सायरस यांच्या मर्सिडीजमध्ये, दोन्ही मागील सीट बेल्ट त्यांच्या स्थितीत परिपूर्ण स्थितीत आढळले. याचा अर्थ अपघाताच्या वेळी त्यांचा वापर झालेला नव्हता. तर बऱ्याच वेळा या सीटबेल्टचा वापर केला जात नसावा, असा दावा देखील पथकाने केला आहे.

डिव्हायडरला धडकल्याने कारचा पुढील भाग उद्ध्वस्त झाला, मात्र समोरील सीटवर बसलेल्या दोन्ही प्रवाशांचे प्राण वाचले.
डिव्हायडरला धडकल्याने कारचा पुढील भाग उद्ध्वस्त झाला, मात्र समोरील सीटवर बसलेल्या दोन्ही प्रवाशांचे प्राण वाचले.

अपघातात सायरस यांचा जागीच मृत्यू अहमदाबाद-मुंबई महामार्गावर रविवारी झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री (54) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे मित्र जहांगीर पांडोळे (49) यांनाही अपघातात जीव गमवावा लागला. कार चालवणारी महिला डॉक्टर अनायता पांडोळे आणि तिचा पती दारियस पांडोळे जखमी झाले. डेरियस हे जेएम फायनान्शियलचे सीईओ आहेत. या चौघांना स्थानिकांनी कारमधून बाहेर काढले.

सायरस मिस्त्री (लाल वर्तुळात डावीकडे) आणि डॉ अनायता मांडोळे (उजवीकडे) मर्सिडीज-बेंझ अपघातानंतर रस्त्याच्याकडेला फेकल्या गेल्य़ा होत्या.
सायरस मिस्त्री (लाल वर्तुळात डावीकडे) आणि डॉ अनायता मांडोळे (उजवीकडे) मर्सिडीज-बेंझ अपघातानंतर रस्त्याच्याकडेला फेकल्या गेल्य़ा होत्या.

धडकेत कारच्या पुढच्या आणि दोन्ही बाजूच्या एअरबॅग्जही खुल्या झाल्या
एअरबॅग्जबाबत टीमने सांगितले की, अपघात समोरच्या बाजूने झाला असल्याने समोरच्या एअरबॅग्ज उघडल्या. कदाचित उर्जेच्या हस्तांतरणामुळे उजव्या बाजूची एअरबॅग देखील उघडली गेली असेल.

फॉरेन्सिक टीम मर्सिडीज इंडियाच्या अधिकाऱ्यांच्याही संपर्कात आहे. कंपनी आपला अहवाल लवकरच सरकारला सादर करणार आहे. सेव्ह लाईफ फाऊंडेशन व्यतिरिक्त, कलिना, मुंबई येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीजचे पथक देखील अपघाताचा तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...