आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिझनेसमन सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूप्रकरणी पालघर पोलिसांनी शुक्रवारी नवी माहिती दिली आहे. अपघाताच्या वेळी अनाहिता पंडोळे या निष्काळजीपणे कार चालवत होत्या, असा पोलिसांचा दावा आहे. त्यांनी चुकीच्या पद्धतीने सीट बेल्ट घातला होता, त्यामुळे त्यांना अधिक दुखापत झाली.
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष मिस्त्री आणि त्यांचे मित्र जहांगीर पंडोळे यांचा 4 सप्टेंबर रोजी अपघाती मृत्यू झाला. या अपघातात कार चालवत असलेले अनाहिता आणि त्यांचे पती दारियस पंडोळे हे दोघे गंभीर जखमी झाले.
पालघरचे एसपी बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, कार चालवणाऱ्या डॉ. अनाहिता यांनी सीट बेल्ट नीट लावला नव्हता. त्यांनी फक्त खांद्याचा हार्नेस घातला होता आणि लॅप बेल्ट लावलेला नव्हता. कोणत्याही नवीन कारमध्ये सीट बेल्ट न लावल्यास अलार्म वाजतो, पण अनाहिता यांनी हा अलार्मही बंद केला होता.
हा मुद्दा पोलिस आरोपपत्रातही ठेवणार असल्याचे बाळासाहेबांनी सांगितले. याप्रकरणी नोव्हेंबरमध्ये पालघर पोलिसांनी अनाहितांविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. अपघातात जखमी झालेल्या अनाहितांवर दक्षिण मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळेल अशी आशा आहे.
अनाहितांबद्दलही जाणून घ्या
अपघाताच्या वेळी कार चालवत असलेल्या अनाहिता या कन्सल्टंट गायनॅकोलॉजिस्ट आहेत. त्यांना सुमारे 18 वर्षांचा अनुभव आहे, सध्या ब्रीच कँडी हॉस्पिटल, मुंबई येथे कार्यरत आहेत. अनाहितांच्या पतीचे नाव दारियस पांडोळे असून ते जेएम फायनान्शियलचे सीईओ आहेत.
सायरस आणि जहांगीर यांनी सीट बेल्ट घातला नव्हता
ओव्हरटेक करताना भरधाव वेग आणि निर्णयातील चुकीमुळे कार रस्ता दुभाजकावर आदळल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातात जीव गमावलेले मिस्त्री आणि जहांगीर या दोघांनीही सीट बेल्ट घातला नव्हता. त्याचवेळी डिव्हायडरला धडकल्यानंतर कारच्या पुढील एअरबॅग्ज उघडल्या, मात्र मागील एअरबॅग योग्य वेळी उघडल्या नाहीत. चुकीच्या बाजूने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना कार भरधाव वेगात होती आणि दुभाजकाला धडकली, असेही एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
सायरस यांच्या मृत्यूचे कारण मल्टीट्रॉमा
पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार सायरस मिस्त्री यांच्या अंतर्गत अवयवांना या अपघातात गंभीर दुखापत झाली होती. वैद्यकीय भाषेत याला पॉलीट्रॉमा म्हणतात. त्यामुळे सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. सायरस आणि जहांगीर यांचे पोस्टमॉर्टम मुंबईतील जेजे रुग्णालयात करण्यात आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.