आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cyrus Mistry Passed Away Cyrus Loved SUVs, Reading Books, Playing Golf, And Avoiding Parties

मिस्त्री कुटुंबाला 4 महिन्यांत दुसरा धक्का:सायरस यांना SUV कारची खूप आवड होती, पुस्तक वाचन-गोल्फमध्ये रमत, पार्ट्यांपासून दूर

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय उद्योगपती सायरस पालोनजी मिस्त्री यांचे रविवारी पालघरमध्ये अपघाती निधन झाले. सायरस यांना एसयूव्ही कारची खूप आवड होती. फावळा वेळ ते पुस्तकांचे वाचन, गोल्फ खेळणे यात घालवत. ते फुडी होते. परंतु पार्ट्यांमध्ये कधी रमले नाहीत. सायरस यांचे मुंबई, पुण्यासह लंडनमध्येही घर आहे. सुट्यांमध्ये ते युरोपला फिरायला जात. सायरस मिस्त्री पारशी समुदायातील होते. त्यांचा जन्म आयर्लंडमध्ये झाला. त्यांच्याकडे आयर्लंडचे नागरिकत्व आहे. टाटा आडनाव नसलेले ते टाटा समूहाच्या १०० वर्षांच्या इतिहासातील दुसरे व्यक्ती होते. त्यांचे पणजोबा पालोनजी शापूरजी मिस्त्री (काँट्रॅक्टर) यांनी १८०० च्या आसपास बांधकाम उद्योगाला सुरुवात केली. १९२४ मध्ये टाटा समूहाला मुंबईत आपले मुख्यालय ‘बाॅम्बे हाऊस’बांधायचे होते. शापूरजींनी त्याचे कंत्राट घेतले. १९३० नंतर एसपी ग्रुपने टाटा समूहाच्या सर्व बांधकामांची जबाबदारी आपल्या हाती घेतली. म्हणूनच टाटा ट्रस्ट वगळता टाटा समूहाचे सर्वाधिक १८.५ टक्के शेअर याच मिस्त्री परिवाराकडे आहेत. मिस्त्री यांनी वयाच्या २३ व्या वर्षी कुटुंबाच्या बांधकाम उद्योगाची धुरा हाती घेतली.

उत्तराधिकारी, पण पदावरून हटवले, नंतर कोर्टात धाव २४ ऑक्टोबर २०१६ रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील टाटा समूहाचे मुख्यालय बाॅम्बे हाऊसमध्ये कार्यकारी मंडळाची बैठक होणार होती. बैठकीपूर्वी मिस्त्री एका खोलीत बसलेले होते. त्याचवेळी रतन टाटा व नितीन नोहरिया खोलीत आले. नोहरिया हार्वर्ड बिझनेस स्कूलचे अधिष्ठाता होते. ते रतन टाटांच्या मित्र परिवारातील होते. टाटा शांत होते. परंतु नितीन यांनी मिस्त्री यांना काही गोष्टी ऐकवल्या. रतन टाटांसोबत तुमचे पटत नाही. म्हणूनच तुम्ही राजीनामा द्यावा अन्यथा मंडळाच्या बैठकीतून तुमच्यावर कारवाई होईल. पण मिस्त्री यांनी राजीनाम्यास नकार दिला. मग बैठकीत मिस्त्री यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला. मिस्त्री दुसऱ्या दरवाजाने त्यांचे मित्र अपूर्व दीवानजींसोबत बाहेर पडले. नंतर मिस्री त्या विरोधात सुप्रीम कोर्टापर्यंत गेले.

खोटेपणा भावला नाही : टाटा समूहाचे प्रमुख झाल्याच्या दुसऱ्या दिवशी सायरस बाॅम्बे हाऊसला पोहोचलेे. ते साधारण पँट-शर्ट परिधान करून आलेले होते. स्वागताला उपस्थित सुटाबुटात होते.

जमिनीशी नाळ जुळलेली : ससायरस यांचा स्वभाव, वागणे रतन टाटा यांच्यासारखे होते, असे त्यांना आेळखणारे लोक सांगतात. दोघांच्याही सवयींत साम्य होते.

बातम्या आणखी आहेत...