आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Cyrus Mistry Ratan Tata | Tata Sons Cyrus Mistry Dispute Supreme Court Judgment Today Latest News Update

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टाटा-मिस्त्री वाद:सर्वोच्च न्यायालयाने बदलला NCLAT चा आदेश, टाटा ग्रुपला दिला दिलासा, म्हणाले - सायरस मिस्त्रींना हटवणे कायदेशीररित्या योग्य

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवला होता

सर्वोच्च न्यायालयाने टाटा ग्रुपची कंपनी टाटा सन्स लिमिडेट आणि शापूरजी पलोनजी ग्रुपच्या सायरस मिस्त्रीच्या प्रकरणामध्ये आज आपला निर्णय दिला आहे. कोर्टाने NCLAT चा निर्णय फेटाळून लावत म्हटले की, मिस्त्रींना टाटा सन्सला चेअरमन पदावरुन हटवणे कायदेशीररित्या योग्य आहे.

टाटा आणि एसपी समूहानेही शेअरचे प्रकरण मिळून निकाली काढावे, असेही कोर्टाने म्हटले आहे. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निकाल दिला, ज्यात जस्टिस ए.एस. बोपन्ना आणि व्ही. रामसुब्रमण्यम यांचा समावेश होता.

गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवला होता
कोर्टाने 17 डिसेंबर रोजी या प्रकरणात आपला निर्णय राखून ठेवला होता. खरं तर टाटा सन्सने नॅशनल कंपनी लॉ अपील ट्रिब्यूनल (एनसीएलएटी) च्या 18 डिसेंबर 2019 च्या आदेशाला आव्हान दिले होते, ज्यामध्ये टाटा सन्स लिमिटेडच्या अध्यक्षपदी सायरस मिस्त्री यांची पुन्हा नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. यावर सर्वोच्च न्यायालयाने 10 जानेवारी 2020 रोजी स्थगिती दिली होती. मिस्त्री टाटा सन्सचे सर्वात तरुण अध्यक्ष होते. टाटा सन्समध्ये मिस्त्री कुटुंबाचा 18.4% हिस्सा आहे. टाटा ट्रस्टनंतर ते टाटा सन्समध्ये दुसरे मोठे शेअर होल्डर्सही आहेत.

NCLAT ने आपल्या डिसेंबर 2019 च्या निर्णयात म्हटले होते की, 24 अक्टोबर 2016 ला टाटा सन्सच्या बोर्ड बैठकीमध्ये चेअरपर्सनच्या बदावरुन सायरस मिस्त्रींना हटवणे बेकायदेशीर होते. यासोबतच निर्देशही दिला होता की, टाटा सन्स संचालक मंडळामध्ये बहुमत किंवा एजीएममध्ये बहुमत असावा यासाठी रतन टाटा यांनी आगाऊ कोणताही निर्णय घेऊ नये.

सायरस मिस्त्री यांनी डिसेंबर 2012 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आणि 24 ऑक्टोबर 2016 रोजी कंपनीच्या बहुसंख्य संचालक मंडळाने त्यांना या पदावरून काढून टाकले. त्यानंतर, 6 फेब्रुवारी 2017 रोजी आयोजित केलेल्या बैठकीत (ईजीएम), भागधारकांनी मिस्त्री यांना टाटा सन्सच्या मंडळामधून काढून टाकण्यासाठी मतदान केले. त्यानंतर एन चंद्रशेखरन यांनी टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्षपद स्वीकारले.

या प्रकरणी दोन शापूरजी पल्लोनजी कंपन्यांनी मिस्त्री यांना हटवणे आणि अल्पसंख्यांक शेअरधारकांचा छळ व गैरव्यवहार केल्याचा आरोप करत नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल येथे संपर्क साधला. या दोन्ही कंपन्या टाटा सन्समध्ये शेअरहोल्डर्स आहेत. तथापि, जुलै 2018 मध्ये एनसीएलटीने याचिका फेटाळली ज्याच्या विरोधात पल्लोनजी कंपन्यांनी अपील केली होती.

अपीलमध्ये शापूरजी पलोनजी कंपन्यांनी म्हटले होते की, NCLAT मिस्त्रीला काहीसा दिलासा देण्यास अयशस्वी ठरला. म्हणून मिस्त्री कंपन्यांना टाटा सन्स संचालक मंडळाने गठित केलेल्या सर्व समित्यांमध्ये प्रतिनिधित्वाचा हक्क मिळाला पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...