आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cyrus Mistry's Car Accident Due To Faulty Bridge Over Surya River, Not Wearing Seat Belt Fatal

फॉरेन्सिक टीमचा निष्कर्ष:सायरस मिस्त्री यांचा कार अपघात सूर्या नदीवरील सदोष पुलामुळेच, सीट बेल्ट न बांधणे ठरले प्राणघातक

मुंबई/नवी दिल्ली/जिनेव्हा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या कारला अहमदाबाद-मुंबई महामार्गावर सूर्या नदीवरील पुलाच्या सदोष डिझाइनमुळे अपघात झाला. चौकशी करणाऱ्या फाॅरेन्सिक टीमने ही माहिती दिली. सात सदस्यांच्या फाॅरेन्सिक टीममध्ये आयआयटी खरगपूरच्या तज्ज्ञांचा समावेश आहे. फाॅरेन्सिक टीमनुसार, मर्सिडीज बेंझ कारचे सेफ्टी फीचर कार्यरत होते. अपघाताच्या वेळी एअरबॅग उघडल्या, पण सीट बेल्ट न लावल्याने सायरस मिस्त्री यांना गंभीर जखमा झाल्या, तेच त्यांच्या मृत्यूचे कारण ठरले. अपघातस्थळापासून काही मीटर अंतर आधीच रस्ता तीन लेनवरून दोन लेनचा होतो. त्याचबरोबर पुलाजवळ उंचवटा आहे आणि नंतर पुढे खूप उंचीचे डिव्हायडर अपघातासाठी कारणीभूत ठरले. सायरस मिस्त्री रविवारी अहमदाबाद येथून मुंबईला येत होते.

पालघर जिल्ह्यात पुलाजवळ त्यांच्या कारला अपघात झाला होता. त्यात कारचालकासह दोन जण जखमी झाले होते, तर मागच्या सीटवर बसलेले सायरस मिस्त्री आणि त्यांचे मित्र जहांगीर पंडोले यांचा मृत्यू झाला होता.अपघाताच्या चौकशीसाठी महाराष्ट्र पोलिस आणि परिवहन विभागाने फाॅरेन्सिक टीम गठित केली होती. तीत आयआयटी खरगपूरचे दोन तज्ज्ञ, प्रत्येकी एक मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअर यांच्याशिवाय सिम्युलेशन आणि माॅडलिंगमधील तज्ज्ञ लोक आहेत. फाॅरेन्सिक टीम आपला अहवाल लवकरच सादर करेल.

आयआरएफ सुरक्षा ऑडिट करणार, ब्लॅक स्पाॅट चिन्हित करणार : जिनेव्हा येथील आंतरराष्ट्रीय रस्ते महासंघ (आयआरएफ) अहमदाबाद-मुंबई महामार्गावर कोणत्या ठिकाणी अपघात होऊ शकतात त्या संभाव्य भागांची ओळख पटवणार आहे.

बातम्या आणखी आहेत...