आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dainik Bhaskar Receives The World's Most Prestigious Van Infra Award In The Field Of Innovation

अवॉर्ड:‘दैनिक भास्कर’ला इनोव्हेशन क्षेत्रातील जगातील सर्वात प्रतिष्ठित वान इन्फ्रा अवॉर्ड

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भिलवाडात कपड्यावरील वृत्तपत्र वाचकांना अर्पण, देशात पहिलाच प्रयोग

दैनिक भास्करला जगातील सर्वात प्रतिष्ठित वान इन्फ्राद्वारे (वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर अँड न्यूज पब्लिशर्स) मुद्रित माध्यमातील इनोव्हेशन अवॉर्ड २०२१ ने गौरवण्यात आले. भास्करला हा पुरस्कार प्रॉडक्ट इनोव्हेशन या श्रेणीत देण्यात आला.

दैनिक भास्करने टेक्स्टाइल सिटी भिलवाडाच्या पंधराव्या स्थापनादिनी वृत्तपत्राचे मुख्य पान कपड्यावर तयार करून ते वाचकांना समर्पित केले होते. वृत्तपत्र कपड्यावर प्रकाशित करण्याची ही देशातील पहिलीच वेळ ठरली. कपड्यांवरच बातम्या प्रकाशित झाल्या. जर्मनीच्या बर्लिनमध्ये ११ नोव्हेंबर रोजी व्हर्च्युअल पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदा पाच श्रेणींत ४० प्रवेशिका आल्या होत्या. भास्करने २५ जानेवारी रोजी भिलवाडाच्या वाचकांसाठी हा एक गौरवशाली अंक तयार केला होता. ५० जणांच्या टीमने २८ दिवस परिश्रम केल्यानंतर हा अंक साकारला. हा अंक २०४ पानांचा होता. या कामगिरीबद्दल दैनिक भास्करचे संचालक गिरीश अग्रवाल म्हणाले, आपण वाचत असलेले वर्तमानपत्र केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील इनोव्हेशन, नॉलेज व क्वालिटी अशा दर्जेदार आशयासाठी नावाजले जात असल्याचा गर्व निश्चितपणे वाचकांना वाटेल.

इतर गौरवमूर्ती : जाहिरातीमधील इनोव्हेशनसाठी अॅड्स २४, प्रॉडक्ट फॉर यंग रीडर्ससाठी ‘एचएस लास्टेन युटीसेट’, स्पेशल एडिशनसाठी ‘टोरँटो स्टार’ व सस्टेनेबॅलिटी इनोव्हेशनसाठी व्ही. के. मीडियाला पुरस्काराने गौरवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...