आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dainik Bhaskar Survey : The Biggest Survey To Date On Teacher's Day Is More About Character Building Than Career Preparation

शिक्षकदिन विशेष सर्व्हेक्षण:शिक्षकदिनी आजवरचा सर्वात मोठा सर्व्हे, करिअरच्या तयारीपेक्षा चारित्र्य घडवणे जास्त गरजेचे

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दैनिक भास्करच्या सर्व्हेत १८ हजारांपेक्षा जास्त शिक्षक व पालकांनी घेतला भाग, मुलांच्या यशस्वितेच्या मूलमंत्रांवर दोन्ही एकमत...

गेले दीड वर्षात आपल्या संपूर्ण शिक्षणव्यवस्थेसाठी एक नव्या परीक्षेसारखे होते. केवळ मुलेच नव्हे, तर शिक्षक व पालकही या काळात अनेक नव्या गोष्टी शिकले आहेत. शिक्षक आणि पालकांसाठी मुलांची शारीरिक सुदृढता जास्त महत्त्वपूर्ण ठरली आहे. करिअरऐवजी चारित्र्य व विनम्रताही अधिक मोलाची असल्याचे दिसते. पालक शिक्षकांकडून मुलांना उत्तम नागरिक बनवण्याची अपेक्षा ठेवतात.

जाणून घ्या... काय आहे शिक्षकांचे मत
43.2% शिक्षक म्हणाले, मुले वेगाने ऑनलाइन पद्धत शिकली, त्याचे आश्चर्य
39.3% शिक्षक म्हणाले की, शंका व भीतीविरुद्ध स्वत:च लढण्याच्या मुलांच्या क्षमतेने चकित केले. 17.5% म्हणाले, अनुभव नसतानाही विद्यार्थ्यांचे उत्तम ई-लर्निंग निकाल आश्चर्यचकित करतात.

72.4% शिक्षकांची इच्छा - मुलांसोबत मैत्रीपूर्ण संबंधांची, मुले प्रत्येक गोष्ट शेअर करू शकतील
10.9% शिक्षकांनी पालकांशी प्रत्येक बाब शेअर करणे गरजेचे मानले. 9.2% शिक्षक म्हणाले, शिक्षक मृदू अन् काळजी घेणारे असले पाहिजेत. 7.4% म्हणाले, शिक्षक कडक असले पाहिजेत.

57% शिक्षक म्हणाले- मुले मोबाइलसोबत एकटे राहण्याच्या प्रवृतीने मोठी चिंता वाटते
20% शिक्षकांच्या मते, मुलांनी लहानपणापासूनच करिअरची चिंता करणे धोकादायक आहे. 20.5% म्हणाले, मुलांमध्ये धैर्याची कमतरता चिंतेचे कारण. 3.7% म्हणाले, जास्त कमाईला यश मानण्याची प्रवृत्ती धोकादायक आहे.

71.9% म्हणाले, आम्हाला सन्मान तर खूप मिळतो, मात्र त्या अनुरूप पगार मिळत नाही
दैनिक भास्करच्या सर्व्हेत सहभागी सर्व शिक्षकांना त्यांचे वेतन कमी असल्याचे वाटते. 28.1% शिक्षक म्हणाले, आम्हालाही डॉक्टर्स, इंजिनिअर्स व इतर प्रोफेशनल्सप्रमाणे चांगला पगार मिळायला पाहिजे.

35.4% शिक्षक म्हणाले, शिक्षकांकडून बालमानसशास्त्राचे कोर्स करवून घ्यावेत
26.7% शिक्षकांच्या मते दरवर्षी प्रावीण्याचे कोर्स घ्यावेत. 28.5% लोकांना दर २ वर्षांनी शिक्षकांची कौशल्य चाचणी करावी वाटते. 9.3% च्या मते, बीएडसाठी राष्ट्रीय सामाईक चाचणी घेतली जावी.

45.3% शिक्षक म्हणाले, दुसरी संधी मिळाली तरी आम्ही शिक्षकच बनू
27.9% शिक्षकांना दुसरी संधी मिळाली तर आयएएस बनण्याची इच्छा आहे. 20% शिक्षकांना स्वत:चा व्यवसाय करायचा आहे. 6.8% शिक्षक डॉक्टर वा इंजिनिअर बनू इच्छितात.

58.9% शिक्षक म्हणाले, सामान्य मुलाला यशस्वी झाल्याचे पाहून कृतकृत्य वाटते
33.1% शिक्षक म्हणाले, माजी विद्यार्थ्यांच्या मनात आपल्याबद्दल असलेला सन्मान पाहून एक शिक्षक म्हणून कृतकृत्य वाटते. 7.9% शिक्षक म्हणाले, शाळेच्या भरभराटीत आपले योगदान पाहून खूप समाधानी वाटते.

समजून घ्या... पालकांना काय हवंय?
71.5% पालकांची इच्छा, शिक्षकांनी त्यांच्या पाल्यांना उत्तम नागरिक बनवावे
21.5% पालकांच्या मते, शिक्षकांनी मुलांना स्पर्धा परीक्षांची तयारी करून द्यावी. 6.1% ची इच्छा, शाळांत जास्त अभ्यास असावा. 0.9% लोकांना वाटते, शिक्षकांनी त्यांच्या पाल्यास जास्त वेळ द्यावा.

28.9% पालक म्हणाले, गिफ्ट देण्यापेक्षा मुलांसोबत जास्त वेळ घालवणे महत्त्वाचे
28% पालकांना मुले आत्मनियंत्रणात माेठ्यांपेक्षा कमी नसल्याचे जाणवले. 27.8% ने मुलांची अनेक कौशल्ये पहिल्यांदाच बघितली. 15.3% म्हणाले, मुलांची आजी-आजोबांशी गट्टी जमली.

61.4% पालक म्हणाले, प्रत्येेक मूल व शिक्षकांना लस मिळेपर्यंत शाळा बंद ठेवा
सद्य:स्थितीत शाळा उघडण्याच्या प्रश्नावरही पालकांचे बहुमत लसीकरण पूर्ण होईपर्यंत शाळा बंद ठेवावी याच निर्णयाच्या बाजूने आहे. याउलट 38.6% पालकांनी शाळा तत्काळ उघडल्या जाव्यात, असे मत मांडले.

67.5% पालकांच्या मते, गॅजेट्सच्या आहारी गेलेल्या मुलांसाठी स्वयंशिस्त सर्वात महत्त्वाची
18.9% पालकांना वाटते की मुलांना मर्यादित वेळेपुरताच स्मार्टफोन दिला जावा. 11.9% पालकांनुसार, मुलांना इयत्ता ८ वी पर्यंत स्मार्टफोन देऊ नये. 1.7% म्हणाले, मोबाइलचा डेटा प्लॅन कमी करण्यात यावा.

42.5% पालक म्हणाले, दीड वर्षामध्ये मुलांना कुटुंबापुढील आव्हाने समजली
28.1% पालकांनी दीड वर्षात मुले चिडचिडी झाल्याचे सांगितले. 19% लोक म्हणाले, मुले आरेाग्याबाबत जागरूक झाली. 10.4% म्हणाले, बचत-पैशाचे महत्त्व मुलांनाही कळाले आहे.

92% पालकांच्या मते, यापुढे परीक्षा घेतल्याविना बोर्डाचे निकाल जारी करू नये
पालकांच्या मते, परीक्षेविना मूल्यमापनाची पद्धत केवळ विशिष्ट परिस्थितीच योग्य होती. तथापि, 8% पालक म्हणाले, परीक्षेविना मूल्यमापनामुळे मुलांवरील दबाव कमी होतो.

47.8% पालक म्हणाले, आयुष्यातील व्यावहारिकतेचे धडे शिक्षकच देत असतात
41% पालकांच्या मते, मुलांचा शिक्षकांवरील विश्वास सर्वात महत्त्वाचा आणि अनमोल आहे. 11.8% पालक म्हणाले, शाळा बंद असतानाही मुलांना शिकवण्यासाठी शिक्षक घरी आले. समर्पित वृत्तीने काम करण्याची ही भावना मोलाची आहे.

बातम्या आणखी आहेत...