आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्करची 'मेरी माँ' चित्रकला स्पर्धा:आईचे प्रेम, त्याग आणि संघर्ष दाखवणारी 23 चित्रे, भास्कर कार्यालयात लावणार चित्रकृती

10 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

मातृदिनानिमित्त दैनिक भास्करने 25 एप्रिल ते 1 मेदरम्यान विशेष चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. 'मेरी माँ' या थीमवर आयोजित या चित्रकला स्पर्धेत सर्व वयोगटातील, वर्गातील लोकांनी प्रवेशिका पाठवल्या. यामध्ये आईचे प्रेम, संघर्ष आणि त्याग या सर्व भावनांचे चित्रण स्पर्धकांनी केले होते.

स्पर्धेत 51 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक नाशिक (महाराष्ट्र) येथील सुरेश बी. पनवार यांनी पटकावले. 31 हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक रायपूर (छत्तीसगड) येथील दीपक शर्मा आणि 11 हजार रुपयांचा तिसरा पुरस्कार धमतरी (छत्तीसगड) येथील बसंत साहू यांनी पटकावला.

स्पर्धेसाठी तब्बल 20475 प्रवेशिका आल्या होत्या. त्यातील निकष पुर्ण करणाऱ्या 18,375 चित्रांमधून सात सदस्यीय ज्युरींनी सर्वोत्कृष्ट चित्रे निवडली. आईबद्दलच्या आपल्या भावनांचा आदर करताना अखेरच्या टप्प्यापर्यंत मिळालेल्या चित्रकृती भास्कर कार्यालयात लावल्या जातील. स्पर्धेत मोठ्या संख्येने प्रवेशिका आल्याने प्रोत्साहनपर (सांत्वनपर) पुरस्कारांची संख्या 10 वरून 20 करण्यात आली आहे. ​​​​​तसेच, ​​विजेत्यांच्या 23 चित्रकृती भास्कर मुख्यालय, भोपाळ येथे झळकतील.

स्पर्धेसाठी कुठून किती चित्रकृती

 • राजस्थान 6240
 • मध्य प्रदेश 3117
 • गुजरात 2309
 • हरियाणा 1633
 • छत्तीसगड 1515
 • बिहार 852
 • पंजाब 666
 • झारखंड 513
 • महाराष्ट्र 337
 • चंदीगड 111
 • दिल्ली 83
 • हिमाचल प्रदेश 66
 • इतर राज्यांतून 3033
 • एकूण 20,475
बातम्या आणखी आहेत...