आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महात्मा गौतम बुद्ध माझ्या कामावर खूश:दलाई लामा यांचा दावा; बुद्ध कथा वाचण्यासाठी 600 वर्ष जुन्या महोत्सवाला हजारो अनुयायी हजर

धर्मशाळा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा गौतम बुद्ध आपल्या कार्यावर आनंदी असल्याचा दावा तिबेटींचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांनी केला आहे. ते मॅक्लोडगंज स्थित आपला मुख्य बौद्ध विहार थेगछेन छोलिंगमध्ये सुरू असणाऱ्या मोनलम चेनमो नामक 3 दिवसीय प्रार्थना महोत्सवाच्या समारोपावेळी बोलत होते. या महोत्सवात जगभरातील 12 हजारांहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला. 600 वर्ष जुन्या या महोत्सवात जातक कथा ऐकण्याची प्रथा आहे. तिबेटी समुदायात जातक कथांचा अर्थ बुद्धांच्या गतजन्माच्या कथा वाचणे हा आहे.

दलाई लामा म्हणाले की, ते बोधगयेत थायलंडच्या बौद्ध लामांसोबत वार्तालाप करत होते. तिथे बुद्धांची एक थांका (पेंटिंग) लावण्यात आली होती. त्यावेळी अचानक बुद्धांनी त्यांना बोलावले व चॉकलेट दिली. याचा अर्थ हा झाला की, बुद्ध त्यांच्या कार्यावर प्रसन्न आहेत.

दलाई लामा म्हणाले की, बदलांमुळेच मनाला शांतता मिळू शकते. त्यानंतरच मनातील क्लेश संपुष्टात येतील. असे केवळ अभ्यासातूनच शक्य होऊ शकते.

हिमाचलच्या मॅक्लोडगंजमध्ये तिबेटींचे आध्यात्मिक गुरू दलाई लामा व उपस्थित अनुयायी.
हिमाचलच्या मॅक्लोडगंजमध्ये तिबेटींचे आध्यात्मिक गुरू दलाई लामा व उपस्थित अनुयायी.

मन स्थिर ठेवा

दलाई लामा म्हणाले की, समस्यांवर करण्यासाठी मन शांत ठेवण्याची गरज आहे. समस्या बाहेर नव्हे मनातच असतात. यामुळेच क्लेश व अशांतता होते. लोकांचे मिथकच त्यांचे नुकसान करत आहे. सुख-दुःख सर्वांमध्ये असते. ते दूर करूनच जगात शांतता नांदू शकते.

ते म्हणाले की, भारत, तिबेट, चीन व मंगोलियामध्ये बौद्ध धर्माचे पालन करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पाश्चात्य संस्कृतीचे लोकही बौद्ध धर्माचे पालन करत आहेत. धर्म हा कोणा एका व्यक्तीचा नसतो.

तत्पूर्वी, गुरुवारी, उत्सवाच्या शेवटच्या दिवशी, दलाई लामा महात्मा गौतम बुद्धांच्या प्रतिमेपुढे बसले होते. आसन धारण केल्यावर त्यांनी आपल्या डावीकडे बसलेल्या लहान मुलाकडे बोट दाखवून सांगितले की, आज सर्वांसोबत मंगोलियाच्या खलखा जेत्सून धम्पा रिनपोचेचा पुनर्जन्म झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...