आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dalit Girl Throws Flowers, Boycotts 40 Families; It Is Also Forbidden To Participate In The Program And To Buy Goods From The Shops

ओडिशा:दलित कुटुंबातील मुलीने फूल ताेडले, 40 कुटुंबांवर बहिष्कार; कार्यक्रमांत सहभागी हाेण्यास, दुकानांतून सामान खरेदीसही मनाई

भुवनेश्वरएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

ओडिशाच्या ढेंकनाल जिल्ह्यात गेल्या दाेन आठवड्यांपासून ४० कुटुंबांवर बहिष्कार घालण्यात आला आहे. त्यामागे केवळ उच्च जातीच्या व्यक्तीच्या घरातील फूल ताेडल्याचे कारण सांगितले जाते. एका दलित कुटुंबातील मुलीने काही दिवसांपूर्वी फूल ताेडले हाेते. त्यावरून दाेन समुदायांत तणाव निर्माण झाला. त्यानंतर गावातील ४० दलित कुटुंबांवर बहिष्कार घालण्यात आला आहे.

मुलीचे वडील निरंजन नायक म्हणाले, विषय वाढू नये म्हणून आम्ही तेव्हा माफीही मागितली हाेती. परंतु घटनेनंतर अनेक बैठका झाल्या आणि आमच्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय झाला. गावात कुणीही आमच्याशी बाेलत नाही. आम्हाला सामाजिक कार्यक्रमातही भाग घेऊ दिला जात नाही. काेणत्याही दुकानातून सामान घेण्याचीदेखील आम्हाला परवानगी नाही. त्यामुळे सामान आणण्यासाठी कित्येक किलाेमीटर अंतरावरील बाजारात जावे लागते. गावात सुमारे ८०० उंबरे आहेत. त्यापैकी ४० कुटुंबे आमच्या नायक समुदायाची आहेत. हा समुदाय अनुसूचित जातीमध्ये येताे. या प्रकरणात लाेकांनी पाेलिस व जिल्हा प्रशासनाला कळवले आहे. निवेदनही दिले आहे. आमच्या समुदायातील लाेकांना राेजगार मिळणेही कठीण झाले आहे. खरे तर आमच्या समुदायातील लाेक अशिक्षित आहेत. त्यांना कामाच्या शाेधात भटकंती करावी लागत आहे. असे असूनही आमच्याविराेधात फर्मान काढण्यात आले आहे. आम्ही गावात विवाह, अंत्यसंस्कारही करू शकत नाही. पीडितांच्या म्हणण्यानुसार सरकारी शाळांत मुलांना अध्ययन करू दिले जात नाही. समुदायाच्या शिक्षकांनादेखील बदली करून घेण्याची सूचना दिली आहे. या प्रकरणात सरपंच व ग्रामविकास समितीचे सदस्य म्हणाले, गावकऱ्यांना नायक समुदायाच्या लाेकांशी चर्चा करण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतु इतर सर्व आराेप खाेटे आहेत. हा दाेन समुदायांतील विषय आहे. परस्परांशी चर्चेतून साेडवला जाईल.

बातम्या आणखी आहेत...