आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मसनातही जातीवाद:दलित महिलेचा शव चितेवरून उठवला; म्हणाले हे स्मशान आमचं आहे! कुटुंबियांना इतर ठिकाणी करावा लागला अंत्यविधी

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 6 वर्षांच्या मुलाला मुखाग्नी देण्यापासून रोखले, ऐनवेळी येऊन धडकले गावगुंड

स्मशानातही जातीवाद केला जात असल्याचे धक्कादायक उदाहरण उत्तर प्रदेशात समोर आले आहे. आग्रा येथे एका स्मशानात महिलेचा अंत्यविधी करण्याची तयारी सुरू होती. चितेवर मृतदेह ठेवण्यात आला होता. परंतु, ऐनवेळी काही गावगुंड त्या ठिकाणी येऊन धडकले आणि दलित महिलेचा मृतदेह चितेवरून उठवण्यास मजबूर केले. हे घाट आमचे आहे. दलित या ठिकाणी अंतिम संस्कार करू शकत नाहीत असे ते लोक म्हणाले. या घटनेवर पीडित कुटुंबीय इतके घाबरलेले आहेत की त्यांनी पोलिसांत तक्रार सुद्धा केली नाही. महिलेचा मृतदेह तसाच उचलून दुसऱ्या ठिकाणी नेला आणि अंतिम संस्कार केले. या घटनेच्या एका आठवड्यानंतर आता पोलिस सक्रीय झाले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की 20 जुलै रोजी एका महिलेचा आजारपणामुळे मृत्यू झाला. अंतिम संस्कारासाठी कुटुंबीय मृतदेह घेऊन स्मशानभूमीवर पोहोचले. अंत्यविधीची तयारी केली आणि मृतदेह चितेवर झोपवला. या महिलेला 6 वर्षांचा मुलगा देखील आहे. आपल्या आईच्या मृतदेहासोबत काय होत आहे याची त्याला काहीच कल्पना नव्हती. आपल्या आजोबांच्या मदतीने तो चितेला मुखाग्नी देण्याच्या तयारीत होता. त्याचवेळी काही गावगुंड स्मशानात पोहोचले आणि मुलाला थांबवले.

स्मशानाच्या जमीनीवरूनही सुरू आहे वाद

ही घटना आग्रा जिल्ह्यातील अछनेरा तालुक्याची आहे. या ठिकाणी नट समाज मोठ्या संख्येने राहतो. गेल्या काही वर्षांपासून नट वस्तीतील स्मशानभूमीच्या जमीनीवरून तेथील काही स्थानिकांचा वाद सुरू आहे. यापूर्वीही नट समाजातील सदस्याचा मृत्यू झाला तेव्हा अंत्यविधीच्या वेळी गावातील इतर लोकांनी त्यांच्यासोबत वाद केला आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक बब्लू कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे, अछनेरा पोलिस स्टेशनला या प्रकरणाचा तपास करण्यास सांगितले आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. गावात जवळपास 7 स्मशान आहेत. हे स्मशान गावातील वेग-वेगळे समाज अंत्यविधीसाठी वापरतात.