आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्निकांड:दमणच्या प्लास्टिक कारखान्याला भीषण आग, 2 जखमी; अग्निशमनच्या 12 बंबांनी 8 तासांनी मिळवले आगीवर नियंत्रण

वलसाड (गुजरात)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दमण या केंद्रशासित प्रदेशातील रावळवासिया यार्न डाइंग प्रायव्हेट लिमिटेडला रविवारी रात्री आग लागली. अपघाताच्या वेळी कंपनीत 5 कर्मचारी उपस्थित होते. यापैकी 3 जणांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. त्यात दोघे जखमी झाले आहेत. त्याचवेळी इतर 2 कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले. आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकल असल्याने आगीने भीषण रूप धारण केले होते.
कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकल असल्याने आगीने भीषण रूप धारण केले होते.

अग्निशमन दलाच्या 10-12 गाड्या घटनास्थळी

दादरा आणि नगर हवेली आपत्कालीन सेवांचे सहायक संचालक ए के वाला यांनी माहिती देताना सांगितले की, रात्री 11:50 वाजता आम्हाला रावलवासिया यार्न डाईंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत आग लागल्याचा फोन आला. आम्ही इथे आलो आणि पाहिले की संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी आहे. अग्निशमन दलाच्या सुमारे 10-12 गाड्या आग विझविण्याचे काम करत होत्या.

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला 8 तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला 8 तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

कारखान्यात बनतात प्लास्टिकचे धागे

या कंपनीत प्लास्टिकचे धागे बनवले जातात. त्यामुळे याठिकाणी केमिकलही मोठ्या प्रमाणात आहे. प्लास्टिक आणि केमिकलमुळे आग वेगाने पसरली आणि संपूर्ण कंपनीला आग लागली. आग विझविण्यात आली आहे. परंतु, त्यात केमिकल असल्याने अग्निशमन दलाने नंतरही काम केले.