आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्यप्रदेशातील दमोहमध्ये 7 वर्षीय मुलगा आपल्या मित्रांसोबत खेळत होता. खेळता खेळता तो अचानक एका 28 फूट खोल विहिरीत जाऊन पडला. तेव्हा सोबत असलेल्या दुसऱ्या मुलाने प्रसंगावधान राखत जोरजोराने ओरडणे सुरू केले. त्यामुळे त्या मुलाला वेळेत वाचवता आले. मुलाचा आवाज ऐकून घरातील सदस्य धावत सुटले. तेव्हा पाहता तर काय एक जण विहिरीत पडलेला दिसला. त्यानंतर विहिरीचे मालक पवन जैन यांनी जीव धोक्यात घालू मुलाला बाहेर काढले.
नेमके काय झाले आणि कसे घडले
पवन जैन यांनी सांगितले की, अर्णव आणि सन्यम जैन ही दोन मुले खेळत होती. त्यानंतर अर्णवचा पाय जाळीत अडकला आणि तो विहिरीत पडला. दुसऱ्या मुलाने तात्काळ हाक मारली आणि 5 मिनिटात सर्वजण धावत आल्याने त्याचा जीव वाचवता आला. जर सन्यमने जर आरडाओरड केली नसती तर मोठा अनर्थ झाला असता. ते म्हणाले की, विहिरीत पडलेल्या अर्णवला पाईप आत धरण्यास सांगितले. यानंतर दोरी टाकून स्वतः पवन जैन हे विहिरीत उतरले. दोरीच्या सहाय्याने त्याला पूर्णपणे सुरक्षित बाहेर काढले.
अर्णव म्हणाला – जाळी तुटेल असे वाटले नव्हते
अर्णवने सांगितले की, त्याला समजले नाही आणि विहिरीवर लावलेली जाळी अचानक तुटली. तो म्हणाला की, या ठिकाणी दररोज खेळतो. त्याचप्रमाणे तो संपूर्ण अंगणात उड्या मारतो. त्यावेळी तो विहिरीच्या कठड्यावर चालत असताना त्याचा तोल गेला आणि त्याने एक पाय जाळीवर ठेवला. तर दुसरा पाय जाळीत अडकला. आणि मी थेट विहिरीत पडलो. पण सन्यमने मला वाचविण्यासाठी मदत केल्याची भावना त्याने व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.