आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dancing On The Grave | Shakira Murder Case | Who Is Shakereh Khaleeli|Prime Video

IAS पतीला सोडून नोकराशी लग्न:नोकराने 600 कोटींसाठी अंगणातच जिवंत गाडले; कुठे मोलकरणीसाठी पतीने केली पत्नीची हत्या

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

'डान्सिंग ऑन द ग्रेव्ह' ही वेबसिरीज 21 एप्रिल रोजी प्रदर्शित झाली. या 4 भागांच्या मालिकेत, शकीरा खलीलीचे तिचा नोकर श्रद्धानंदसोबतचे प्रेमसंबंध, तिचे अचानक बेपत्ता होणे व नंतर तिची हत्या दाखवण्यात आली आहे. याची कथा दिग्दर्शक पॅट्रिक ग्रॅहम यांनी स्वतः लिहिली आहे. ही मालिका भारतासह जगभरातील 250 देशांत प्रदर्शित झाली.

शकीराच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या श्रद्धानंदचा पॅरोलवर तुरुंगातून बाहेर येण्याचा अर्ज नुकताच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला.

चला तर मग जाऊन घेऊ शकीराच्या हत्येचा किस्सा अन् श्रद्धानंदच्या भयानक कटाची संपूर्ण कहाणी-

म्हैसूरच्या दिवाणाची कन्या शकीराचे IAS अधिकाऱ्याशी झाले होते लग्न

म्हैसूर राजघराण्याच्या दिवाणाची मुलगी व सर मिर्झा इस्माइल यांची नात शकीरा खलीली अतिशय सुंदर व स्टायलिश होती. तिचा थाट राजेशाही होता.

तिचे लहान वयातच सनदी अधिकारी अकबर मिर्झा खलिलीशी लग्न झाले. अकबर ऑस्ट्रेलियात भारताचे उच्चायुक्त होते. ते भारदस्त व्यक्तिमत्त्वाचे धनी होते.

काळ पंख लावल्यासारखा उडत होता. त्यांच्या लग्नाला 25 वर्षे लोटली. दोघांना 4 मुली होत्या. त्यांचे जीवन आनंदाने जात होते. पण शकीराला काहीतरी उणीव भासत होती.

शकीरा मुरलीवर मोहित झाली

लग्नाच्या 25 वर्षांनंतर शकीराच्या आयुष्याला अचानक नवे वळण मिळाले. एका पार्टीत तिची भेट मुरली मनोहर मिश्रा नामक व्यक्तीशी झाली.

मिश्राही राजघराण्यात नोकरी करायचे. त्यांना मालमत्ता व कराची चांगली माहिती होती. त्याने शकीरावर अशी कोणती जादू केली की ती त्याच्या प्रेमात पडली माहिती नाही.
मिश्राही राजघराण्यात नोकरी करायचे. त्यांना मालमत्ता व कराची चांगली माहिती होती. त्याने शकीरावर अशी कोणती जादू केली की ती त्याच्या प्रेमात पडली माहिती नाही.

शकीराने अकबर खलीलीशी घटस्फोट घेतला. 1986 मध्ये तिने मुरली मनोहर मिश्राशी लग्न केले. त्यानंतर मुरली मनोहर मिश्रा यांनी आपले नाव बदलून श्रद्धानंद ठेवले.

शकीरा अचानक बेपत्ता, मुलीची पोलिसांत तक्रार

एप्रिल 1991 मध्ये, श्रद्धानंदने पत्नी शकीराला चहामध्ये झोपेचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर तिला बंगळुरूतील रिचमंड रोडवरील बंगल्यात नेले. तिला एका शवपेटीत बंद केले. त्यानंतर तिला जिवंत पुरले. आई अचानक बेपत्ता झाल्यामुळे मुलीने मुंबईहून बंगळुरू गाठले. मुलीने श्रद्धानंदला तिच्या आईविषयी विचारणा केली तेव्हा तो म्हणाला - शकीरा प्रेग्नंट असून, चेकअपसाठी ती अमेरिकेतील रुझवेल्ट हॉस्पिटलमध्ये गेली आहे.

मुलीने अमेरिकेत शोध घेतला. पण ती सापडली नाही. त्यानंतर मुलीने आई हरवल्याची तक्रार दाखल केली. राजघराण्याशी संबंधित प्रकरणामुळे पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. पण काहीही निष्पन्न झाले नाही. हे प्रकरण बंद करण्याची वेळ आली. पण 3 वर्षांनंतर असे काही घडले की, पोलिसांना शकीराचा खून झाल्याची माहिती मिळाली अन् ते थेट खुन्यापर्यंत पोहोचले.

दारूच्या ठेक्यावर दारुडा नोकराने फोडली खुनाला वाचा...

पोलिसांचा पहिला संशय श्रद्धानंदवर होता. त्याची चौकशी झाली. पण त्याच्या प्रभावामुळे पोलिसांना कडक कारवाई करता आली नाही. 29 एप्रिल 1994 ची ती रात्र होती. बंगळुरू क्राइम ब्रँचचा हवालदार दारूच्या दुकानावर बसला होता. तेवढ्यात एक मद्यधुंद व्यक्ती तिथे आला. तो हवालदारासमोर फुशारकी मारायला लागला. पोलिस ज्या शकीराला शोधत आहेत ती हयातही नाही, असे तो म्हणू लागला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. ही व्यक्ती श्रद्धानंदचा नोकर होता. त्याने सांगितले की, श्रद्धानंदने शकीराला शवपेटीत बंद करून जिवंत गाडले होते. त्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता, त्याने श्रद्धानंदच्या कारनाम्या बिंग फोडले. नोकराने सांगितलेल्या गोष्टीची पडताळणी करण्याच्या बहाण्याने पोलिसांचे पथक श्रद्धानंदच्या घरी पोहोचले.

मृतदेह बंगल्यातून खोदून काढला

हा गुन्हा शकीराची 600 कोटींची संपत्ती हडपण्यासाठोी करण्यात आला होता. तिला एप्रिल-मे 1991 मध्ये केव्हातरी अंमली पदार्थ पाजून जिवंत दफन करण्यात आले होते. मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर 30 एप्रिल 1994 रोजी श्रद्धानंदला अटक करण्यात आली. 2000 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. 2005 मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने श्रद्धानंदच्या अपिलावर सुनावणी करताना 2008 मध्ये त्याच्या फाशीचे जन्मठेपेत रुपांतर केले.

आता या मालिकेच्या माध्यमातून या हत्याकांडाची संपूर्ण कथा पुन्हा जगासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यात या प्रकरणाशी संबंधित किंवा त्यात गुंतलेल्या लोकांची विधाने पाहता येतील.

सुप्रीम कोर्टात सुटकेसाठी अर्ज

81 वर्षीय श्रद्धानंद पत्नी शकीरा खलीलीच्या हत्येप्रकरणी 1994 पासून जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. गतवर्षी त्यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली. त्यात राजीव गांधींच्या मारेकर्‍यांसारखी आपलीही 29 वर्षे तुरुंगवास भोगल्यामुळे सुटका करण्यात यावी, असे नमूद करण्यात आले होते.

आता वाचा अशाच आणखी काही कथा...

मोलकरणीसाठी पत्नीची हत्या, 24 वर्षांची शिक्षा

ऑस्ट्रेलियात पत्नीचा खून करणाऱ्या पतीला 40 वर्षांनंतर न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने त्याला 24 वर्षांची शिक्षा सुनावली. आपल्या अल्पवयीन मोलकरणीशी लग्न करण्यासाठी त्या व्यक्तीने पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह कुठेतरी लपवून ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या व्यक्तीचे वय 74 वर्षे आहे. त्यामुळे त्याला मरेपर्यंत तुरुंगात राहावे लागू शकते.

शिक्षक असणाऱ्या ख्रिस डॉसनने पत्नीच्या हत्येनंतर 40 वर्षे सामान्य जीवन जगले. त्याने आपल्या मोलकरणीशी लग्नही केले.
शिक्षक असणाऱ्या ख्रिस डॉसनने पत्नीच्या हत्येनंतर 40 वर्षे सामान्य जीवन जगले. त्याने आपल्या मोलकरणीशी लग्नही केले.

क्रिस डॉसनने लोकांना सांगितले की, त्याची पत्नी त्याला व मुलांना सोडून एका धार्मिक संघटनेत सामील झाली. लोकांनीही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.

पण 2018 साली एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराने या प्रकरणाची शहानिशा करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वतःच्या पातळीवरून पुरावे गोळा केले व 'टीचर्स पेट' नामक पॉडकास्ट आणले. या पॉडकास्टच्या मदतीने हे प्रकरण संपूर्ण ऑस्ट्रेलियात प्रसिद्ध झाले. जवळपास 3 दशलक्ष लोकांनी हे पॉडकास्ट डाउनलोड केले. त्यानंतर पुन्हा एकदा क्रिस डॉसनवर तपास बसला अन् हे प्रकरण उघडकीस आले.

ब्रिटीश शेतकऱ्याने प्रेयसीसाठी केली पत्नीची हत्या; मृतदेह सेप्टिक टँकमध्ये लपवला, 40 वर्षांनंतर रहस्य उजेडात

यापूर्वी, एका 89 वर्षीय ब्रिटिश शेतकरी डेव्हिड वेनेबल्सला त्याच्या पत्नीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. डेव्हिड व्हेनेबल्स नामक या शेतकऱ्याने आपल्या अनैतिक संबंधांत अडसर ठरणाऱ्या आपल्या पत्नीची हत्या केली होती. हत्येनंतर त्याने मृतदेह टाकीत लपवून ठेवला. तसेच स्वत:च पोलिसात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पण 40 वर्षांनंतर संपूर्ण प्रकरण तपासात उघड झाले.