आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:आमदाराची स्वत:च्या विवाह नोंदणीस दांडी; गर्लफ्रेंडकडून गुन्हा दाखल

भुवनेश्वर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओडिशातील बिजू जनता दलाच्या आमदारांनी स्वत:च्या विवाह नोंदणीला दांडी मारली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या गर्लफ्रेंडने हा गुन्हा दाखल केला. आमदार विजय शंकर दास यांनी विवाहाचे वचन देऊनही ते विवाह नोंदणी कार्यालयात आले नाहीत. वास्तविक दास व त्यांची गर्लफ्रेंड यांनी १७ मे रोजी नोंदणीसाठी अर्ज केला होता. ३० दिवसांच्या अवधीनंतर महिला कार्यालयात पोहोचली, परंतु आमदार महाशयांनी त्याला बगल दिली. या विवाहाला मनाई केली नसल्याचा दावा आमदारांनी केला. नोंदणीसाठी ६० दिवस बाकी असल्याने कार्यालयात गेलो नाही.

बातम्या आणखी आहेत...