आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Danger Like Kedarnath Disaster Is Less Now, Lessons Learned From Destruction, Sensors Are Installed On Lakes

एक्सक्लुझिव्ह:केदारनाथ आपत्तीसारखा धोका आता कमी, विध्वंसातून मिळाला धडा, तलावांवर लावताहेत सेन्सर

मनमीत | डेहराडून8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिमालयातील सरोवरे यापुढे विनाशाचे कारण बनणार नाहीत. वाडिया हिमालय भू- विज्ञान संस्थेने उत्तराखंडमधील सर्व हिमनदी व तलावांमध्ये सेन्सर रेकॉर्डर बसवण्यास सुरुवात केली आहे. ३२९ तलावांपैकी ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. १६ जून २०१३ च्या रात्री सरोवरातील हिमनदीवरून हिमस्खलन झाले होते. आपत्तीनंतर वाडिया संस्थेने अशा हिमनदी तलावांचे सर्वेक्षण केले. यामध्ये ३२९ तलाव संवेदनशील आढळले. त्यामध्ये सेन्सर बसवले जात आहेत. ७०% काम पूर्ण झाले आहे. सध्या ‘मोरन धरण तलाव’मध्ये सेन्सर्स बसवले जात असल्याचे संचालक डॉ. कलाचंद यांनी सांगितले.

पातळी वाढताच मिळतील सिग्नल, पाणी सोडले जाईल सेन्सर बसवल्यामुळे तलावाच्या पाण्याची पातळी वाढताच, ढगफुटी किंवा हिमस्खलन झाल्यास संस्थेच्या नियंत्रण कक्षाला सिग्नल मिळतील. मग शास्त्रज्ञ लगेच तलावाला ‘पंक्चर' करण्याची प्रक्रिया सुरू करतील. वाडिया संस्थेचे माजी ग्लेशियर सायंटिस्ट डॉ. डी. पी डोभाल सांगतात की, असे बहुतेक तलाव हिमनदीजवळ तयार होतात. म्हणूनच त्यांना पंक्चर करण्यासाठी स्फोट केला जात नाही. धोक्याचे मूल्यांकन केल्यानंतर, विशेष पंपाने पाणी काढले जाते. आउटलेट तयार केले जाते, जेणेकरून पाणी हळूहळू बाहेर पडेल.

हिमालय पर्वतरांगांत ३ प्रकारचे तलाव, मोरन धरण धोकादायक
१. सुपरा : हिमनदीच्या वर तयार होतो. १०-२० मीटर पर्यंत क्षेत्र. असे ८०९ तलाव.
2. मोरन धरण : हे ग्लेशियरच्या शेवटी आहेत. असे ३२९ तलाव आहेत.
3. ग्लेशियर इरोसिन : धोका नाही. उत्तराखंडमध्ये अशी १२५ सरोवरे आहेत.

बातम्या आणखी आहेत...