आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Danger Of Dengue, Flu, Other Pandemics Including Corona, Union Health Ministry Guidelines For Prevention

आरोग्य:कोरोनासह डेंग्यू, फ्लू, इतर साथींचाही धोका, बचावासाठी केंद्रीय आराेग्य मंत्रालयाचे दिशानिर्देश

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या आजारांचा संसर्ग कोरोनाच्या संसर्गासोबत होऊ शकतो

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या संसर्गासोबतच डेंग्यू, मलेरिया, इन्फ्लुएंझा, चिकुनगुन्या आणि इतर मोसमी संसर्ग होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर बचाव आणि उपचारासाठी दिशानिर्देश जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी या मोसमात डेंग्यू आणि चिकुनगुन्यासारख्या आजारांचा फैलाव होतो मात्र, कोरोनाच्या संसर्गासोबत हे आजार जास्त घातक ठरू शकतात.

सरकारचे म्हणणे आहे की, या आजारांचा संसर्ग कोरोनाच्या संसर्गासोबत होऊ शकतो. यामुळे निदान करण्यात अडचणी येऊ शकतात. आरोग्य मंत्रालयानुसार कोरोनाच्या प्रकरणात तीव्र ताप आणि खोकला व ताप, खोकला, अशक्तपणा/ थकवा, डोक ेदुखणे, गळ्यात खवखव, कोरिजा, डिस्पेनिया, अॅनोरेक्सिया / उलटी, बदललेली मानसिक स्थिती यासारखी तीन किंवा त्यापेक्षा जास्त लक्षणे गंभीरपणे दिसू शकतात. तर डब्ल्यूएचओनुसार या प्रकारच्या प्रकरणांची परिभाषा खूप स्पष्ट नाही. त्यानुसार डेंग्यू, मलेरिया आणि फ्लूसारख्या मोसमी आजारात ताप, अशक्तपणा यासारखी लक्षणे दिसतात.

त्यामुळे कोरोना झाल्याचा समज होतो. मात्र, कोरोनासोबतच या आजारांचाही संसर्ग झाल्यास त्याचे निदान करणे अवघड जाते. यामुळे या प्रकरणात आयसीएमआर (कोरोनासाठी), व्हेक्टर बॉर्न डिसीज (मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुन्या) साठी, एनव्हीबीडीसीपी आणि माेसमी आजारात (इन्फ्लुएंझा, लेप्टोस्पायरोसिस, स्क्रब टायफस) एनसीडीसीच्या शिफारशींनुसार तपासणी करण्याची गरज आहे.