आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Dangerous Border Seals On All Three Sides, BSF Stops Infiltration Attempt From Roads, Flood Lights, Towers

गुजरात:धोकादायक सीमा हरामीनाला तिन्ही बाजूंनी सील, बीएसएफने रोड, फ्लड लाइट, टॉवरपासून थांबवला घुसखोरीचा प्रयत्न

हरामीनाला झीरो पॉइंटवरून डी. डी. वैष्णव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीन-पाकिस्तानसोबतच्या तणावामुळे गुजरातच्या कच्छमध्ये दलदलीच्या सीमेवरील महत्त्वाची वार्ता

बीएसएफने गुजरातच्या सर्वात धोकादायक पश्चिमी सीमेपासून पाकिस्तानची घुसखोरी पूर्णत: थांबवली आहे. प्रचंड दलदल असलेल्या हरामीनाल्यापर्यंत सुरक्षा करणे खूप अवघड जात होते. ही सीमा तिन्ही बाजूने बंद करण्यात आली आहे. येथे बीएसएफने २२ किमी लांबीची फ्लड लाइटने सुसज्ज असा पक्का रस्ता तयार केला. हा रस्ता नाल्याच्या तोंडापर्यंत जातो. तसेच रस्त्याच्या कडेला वॉच/ओपी टॉवर व पोस्ट (बीओपी) उभे करण्यात आले आहेत. कारण दलदलीतून येथे येणे शक्य नाही. फक्त हरामीनालेपासून घुसखोरी होण्याची शक्यता होती. हा २२ किमी नाला १.५ किमीपेक्षाही जास्त रुंद आहे. चार हजार किमी दलदलीच्या प्रदेशात ९२ किमीचा सर क्रीक भागावर पाक ताबा सांगतो आहे.

पहिल्या लखपत पोस्टपासून घुसखाेरी रोखणे अवघड होते

हरामीनाल्यापर्यंत जाण्यासाठी जवान ऑल टरेन वाहन, बोट आणि पायी जात होते. हा प्रवास २५ किमी दूर लखपत कोटपासून सुरू होत असे. अन्यथा कोटेश्वरहून यावे लागत असे. भारतीय बीओपीही लखपतजवळच होती. येथूनच थेड रोड कनेक्टिव्हिटीचे काम सुरू झाले. विजेची लाइन टाकण्यात आली. फल्ड लाइटस बसवण्यात आले. आता पिलर क्रमांक ११७५ जवळ नवी बीओपी बांधण्यात आली. रस्त्याच्या कडेला ओपी टॉवर आहे.

५५ वर्षांत ३० फुटांपासून दीड किमी रुंद झाला नाला

> १९६५ पूर्वीचा हा नाला ३० ते ३५ फूट रुंद होता. आता तो दीड किमी इतका मोठा झाला आहे.

> याचा दुसरा नाला ७०० मीटर व तिसरा ५०० मीटर रुंद आहे. तिन्हींचे २२ किमी चॅनल आहे

> हा नाला सरक्रीकमधून २ वेळा भारतातून व २ वेळा पाकिस्तानातून वाहतो.

सरक्रीक भागातील हरामीनाला सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात मोठे आव्हान होते. येथूनच पाकिस्तानी मच्छीेमार घुसखोरी करत असत. अतिरेक्यांचीही घुसखोरी हाेत असे. आता हा नाला तिन्ही बाजूंनी बंद करण्यात आला आहे. नाल्याच्या तोंडापर्यंत सडक केली आहे. निगराणीसाठी काही नवे बांधकामही सुरू आहे. - जी. एस. मलिक, आयजी, बीएसएफ गुजरात फ्रंटियर