आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिचे सौंदर्यच बनले तिचे शत्रू:शाळेत जाताना झाले होते अपहरण; दस्यु सुंदरी रेणू यादवची अंगावर शहारे आणणारी कहाणी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निळा जीन्स, पांढरा शर्ट, स्पोर्ट शूज व कपाळावर लाल टिळा... ही ओळख होती दस्यु सुंदरी रेणू यादवची. डाकू रेणू यादवची चंबलच्या दऱ्याखोऱ्यांत दहशत होती. ही डाकू राणी एवढी सुंदर होती की, तिचे सौंदर्यच तिचे शत्रू बनले. तिला मिळवण्यासाठी कधीकाळी चंबलच्या दऱ्याखोऱ्यात रक्ताचे पाट वाहणारे डाकू एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी व्याकूळ झाले होते.

डाकू रेणू यादवची कहाणी

गोरा रंग, निष्पाप दिसणारा सुंदर चेहरा, 5 फूट 8 इंच उंची, लांब घनदाट काळे केस... तिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या हिरोइनही फिक्या पडत होत्या. तिला पाहणारा पाहतच बसत होता. 5 बहिणींतील सर्वात मोठी रेणू बालपणापासूनच सुंदर होती. उत्तर प्रदेशाच्या औरेया जिल्ह्यातील जमालीपूर गावात तिचा जन्म झाला. वडील अत्यंत गरीब होते. 5 अपत्य असल्यामुळे कसे तरी घर चालत होते. पण त्यानंतरही वडिलांनी रेणुला शिकवले. तिला पुस्तकांची आवड होती. शिकून सवरून वडिलांना मदत करायची, असे तिचे स्वप्न होते. पण तिच्या नशिबात दुसरेच काहीतरी होते.

चंदन यादवने केले अपहरण

29 नोव्हेंबर 2003 रोजी सकाळी रेणू आपल्या मैत्रिणींसोबत शाळेत जात होती. रस्त्यात चंबलचा डाकू चंदन यादवची तिच्यावर नजर पडली. तिचा साधेपणा व सुंदरता पाहून तो तिच्यावर भाळला. त्याने तिचे अपहरण केले. सायंकाळपर्यंत रेणू घरी न आल्यामुळे तिचे कुटुंब काळजीत पडले. रेणूचे वडील विद्याराम यांनी पोलिसांत तक्रार दखल केली. पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर डाकू चंदन यादवने तिच्या वडिलांकडे तिच्या मोबदल्यात 10 लाखांची खंडणी मागितली. रेणूच्या वडिलांना काहीच समजत नव्हे. अखेरीस, 4 मुलींचा गरीब बाप 10 लाख कुठून आणणार?

जंगलात झाले अतोनात अत्याचार

रेणूचे वडील पोलिस ठाण्याचा उंबरठा झिजवत होते. आपल्या मुलीची सुटका करण्यासाठी ते रोज पोलिसांकडे जावून मदतीची याचना करत होते. पण त्यांची घोर निराशा झाली. रेणू गावातील आपल्या छोट्याशा घरातून थेट चंबलच्या दऱ्याखोऱ्यात पोहोचली होती. आपल्या बहिणी व मैत्रिणींसोबत हसणारी खेळणारी रेणू आता थेट डाकूंच्या गराड्यात एकदम एकटी होती. ती चंदन यादव त्याच्या गँगकडे दयेची भीक मागत होती. सोडण्याची याचना करत होती. पण चंदन यादवने तिच्यावर थोडीही दया दाखवली नाही. सुरुवातीच्या दिवसांत तिच्यावर अनेक अत्याचार झाले. तिला मारहाण करण्यात आली. अनेक दिवसांपर्यंत उपाशी ठेवण्यात आले.

हातात जबरदस्तीने बंदूक थोपवली

रेणू यादवला जबरदस्तीने बंदूक हाती घेण्यासाठी मजबूर करण्यात आले. तिच्या हातात बंदूक थोपवण्यात आली. ती नकार देत राहिली. पण कुणीही ऐकले नाही. आपले वडील किंवा पोलिस एकेदिवशी येऊन आपली डाकूंच्या तावडीतून सुटका करतील या वेड्या आशेवर ती जगत होती. पण अनेक महिने लोटल्यानंतर तिच्यापुढे डाकूंसोबत राहण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही. हीच सुरुवात होती गावच्या साध्याभोळ्या मुलीचे दस्यु सुंदरीत रुपांतर होण्याची. त्यानंतर रेणूने चंदन यादवने जे सांगितले ते सर्व केले.

चंदन यादवच्या मुलाची आई झाली

रेणूला गँगची दस्यु सुंदरी म्हणून घोषित करण्यात आले. त्या दिवसांत डाकू चंदन यादव त्याच्या गँगची राजस्थान, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातील काही गावांत दहशत होती. सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर इतर डाकूही चंदन यादवला घाबरत होते. रेणूच्या नावानेही एव्हाणा अनेक लुटमार, अपहरण, खंडणी सारखे गुन्हे दाखल झाल होते. दुसरीकडे, ती चंदन यादवच्या मुलांची आईही झाली होती. पण तिच्या समस्या सुटल्या नव्हत्या.

तिचे सौंदर्यच तिच्यासाठी ठरली समस्या

पुन्हा एकदा रेणूचे सौंदर्य तिचे शत्रू ठरले. चंदन यादव सारख्या दुसऱ्या डाकूंनाही ती हवी होती. पण चंदनच्या दहशतीमुळे तिच्यावर हात टाकण्याची कुणाची हिंमत होत नव्हती. रेणूला मिळवण्यासाठी चंदन यादव गँगच्याच रामवीर गुर्जर नामक एका डाकूने चंदनला मारण्याचा प्लॅन आखला. 5 जानेवारी 2005 रोजी रात्री रामवीर गुर्जरने गँगचा म्होरक्या चंदन यादववर गोळीबार करून यमसदनी पाठवले. चंदन यादवच्या मृत्युनंतर रामवीरसाठी रेणू यादव मिळवणे सहज सोपे झाले होते.

डाकू रामवीरवर केला गोळीबार

रेणू यादवला रामवीरचा हेतू समजला होता. जवळपास एका आठवड्यानंतर रामवीर यादवने रेणूवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी रेणूने रामवीरच्याच एलएसआर अर्थात सेल्फ लोडिंग रिव्हॉल्वरने त्याला गोळ्या घातल्या. चंदन यादवचा पूर्वीच मृत्यू झाला होता. आता रामवीर यादवलाही तिने गोळ्या घातल्या होत्या. त्यामुळे ती संधी साधून जंगलातून पळून गेली. तिने थेट इटाव्हा पोलिस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले. पण पोलिसांनी रेणूला एलएसआरसह अटक केल्याचा दावा केला होता.

पोलिसांपुढे केले आत्मसमर्पण

रेणू यादववर त्यावेळी पोलिसांत 17 गुन्हे दाखल होते. डाकू रेणू यादवच्या मते, ती स्वतःच पोलिसांना शरण गेली होती. तिच्यावरील सर्व आरोप खोटे होते. प्रदिर्घ काळ खटला चालला. या काळात ती तुरुंगातच राहिली. अखेर 2012 ध्ये न्यायालयाने तिची सर्वच आरोपांतून निर्दोष सुटका केली. एवढेच नाही तर कोर्टाने पोलिसांनाही खडे बोल सुनावले.

मुलीला आपल्या आईकडे पाठवले

तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर रेणूसाठी आयुष्य सोपे नव्हते. रामवीर गुर्जर ज्याला रेणूने त्या रात्री गोळ्या घातल्या होत्या, त्या हल्ल्यातून वाचला होता. रामवीर व त्याची टोळी रेणूवर पुन्हा जंगलात येण्यासाठी दबाव टाकत होते. तिला जिवे मारण्याची धमकी देत होते. त्यानंतर रेणू यादवने तत्कालीन सप सरकारकडे सुरक्षेची मागणी केली. सरकारनेही तिला मुबलक सुरक्षा पुरवली. तिची कोणत्याही स्थितीत पुन्हा जंगलात परतण्याची इच्छा नव्हती. आपल्या मुलीचे चांगल्या पद्धतीने संगोपन व्हावे, आपल्या आयुष्याची सावली तिच्यावर पडू नये यासाठी तिने आपल्या मुलीलाही आपल्या आईकडे पाठवून दिले.

रेणू यादवच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. पण ती खचली नाही. तिची आपल्यासारख्या महिलांसाठी कार्य करण्याची इच्छा आहे. हा मार्ग तिला राजकारणाकडे घेऊन गेला तर तिची राजकारणातही उतरण्याची इच्छा आहे.

बातम्या आणखी आहेत...