आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Data From A Survey Of 3.75 Lakh Participants Across The Country And 150 Companies Across More Than 15 Different Industries

इंडिया स्किल्स रिपोर्ट- 2023:देशभरातील 3.75 लाख सहभागींची चाचणी व 15 पेक्षा अधिक विविध उद्योगांच्या 150 कंपन्यांवर सर्व्हेतील माहिती

दिल्‍लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वाधिक कुशल; देशात २२-२५ वर्षांचे ५६% तरुण नोकरीसाठी पात्र
दिव्य मराठी नेटवर्क | नवी दिल्ली
जगातील सर्वाधिक तरुणांची संख्या असणाऱ्या भारतासाठी चांगली बातमी. इंडिया स्किल्स रिपोर्ट- २०२३ नुसार आपले २२-२५ वयोगटाचे ५६% तरुण नोकरीसाठी पात्र आहेत. ही संख्या सर्व वयोगटापेक्षा जास्त आहे. देशातील ३.७५ लाख उमेदवारांची व्हीबाॅक्स नॅशनल एम्प्लॉयबिलिटी टेस्ट (डब्ल्यूनेट) आणि १५ हून जास्त उद्योगातील १५० कंपन्यात करण्यात आलेल्या इंडिया हायरिंग इन्टेंट सर्व्हेत या गोष्टी समोर आल्या. देशातील ५०.३% लोक नोकरीसाठी पात्र आहेत. ही गेल्या ७ वर्षातील सर्वाधिक संख्या. २०२२ मध्ये ती संख्या होती ४६.२%.

राजस्थानी महिला रोजगार पात्रतेत देशामध्ये अव्वल...
{राजस्थानातील नोकरीपात्र व्यक्तीत सर्वाधिक ५४% महिला आणि पुरुष (४६%) सर्वात कमी.
{महिला ७ व्या वर्षीही नोकरीसाठी पुरुषांपेक्षा जास्त योग्य. ५२.८% महिला नोकरीसाठी पात्र आढळल्या. पुरुषांची संख्या होती ४७.२%.
{तरीही कामकाजाच्या ठिकाणी महिलांचा सहभाग ३३% होता. २०२२ मध्ये तेवढाही नाही.

सर्वात बुद्धिमान; नोकरी मिळवण्यात इंजिनिअरच्या तुलनेत बीकॉमवाले पुढे
इंडिया स्किल्सच्या मागील अहवालात बीटेक करणाऱ्यांना नोकरीसाठी सर्वात योग्य समजले गेले होते. मात्र, ताज्या अहवालात बीकॉमवाल्यांनी त्यांच्यावर मात केली आहे. बीकॉमवाले ६१% तरुण रोजगारासाठी पात्र आढळले तर बीटेकवाले ५७%सह पिछाडीवर गेले. गेल्या ७ वर्षांत पहिल्यांदा बीकॉमवाले सर्वात पुढे निघाले. एमबीएवाले सलग दुसऱ्या वर्षी द्वितीय स्थानी राहिले, मात्र २०२२ च्या अहवालात ५५%च नोकरीस पात्र होते, ताजा आकडा ६०% आहे. बीफार्म (५७.५१%) वाले तिसऱ्या, बीटेक (५७.४४%) चौथ्या, आर्ट‌्स (४९.२०%) ५ व्या, बीएस्सी (३७.६९%) ६ व्या व आयटीआय (३४%) ७ व्या स्थानी राहिले.

या क्षेत्रांत सुवर्णसंधीे...
{२०२३ मध्ये ऑटोमोटिव्ह, इंजिनिअरिंग व इंटरनेट व्यवसायात सर्वाधिक नोकऱ्या उपलब्ध.
{ऑटोमोटिव्ह क्षेत्रात सर्वाधिक ३९% भरती १-५ वर्षे अनुभव असणाऱ्यांचीच होत आहे.
{५५% कंपन्या शासकीय स्किल सेंटरमधून भरती करत आहेत. यात ९०% नी सांगितले, हे लोक अपेक्षानुरूप आहेत. देशात असे १०,८४८ सेंटर आहेत. ८ वर्षांत १.५ कोटी लोक प्रशिक्षित झाले.

सर्वाधिक सक्षम; महाराष्ट्र, यूपीचे तरुण सलग दुसऱ्या वर्षी अग्रस्थानी
देशात सर्वाधिक लोकसंख्या असणारे उत्तर प्रदेश नोकरीच्या योग्यतेत सर्वात अग्रस्थानी आहे. येथे ७२.७ % लोक नोकरी मिळवण्यायोग्य आहेत. महाराष्ट्र ६९.८% सह दुसऱ्या स्थानी आहे. गत इंडिया स्किल्स रिपोर्टमध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश अव्वल २ मध्ये होते. ताज्या अहवालात दिल्ली तिसऱ्या, आंध्र प्रदेश चौथ्या, राजस्थान पाचव्या, कर्नाटक सहाव्या, तेलंगणा ७ व्या, पंजाब ८ व्या, ओडिशा ९ व्या आणि हरियाणा १० व्या क्रमांकावर आहे. तर ०-२.६ लाख रु. वार्षिक पॅकेजची अपेक्षा ठेवणाऱ्यांत सर्वाधिक तामिळनाडूचे आहेत. महाराष्ट्र दुसऱ्या आणि उत्तर प्रदेश तिसऱ्या स्थानी आहे.

नोकरीसाठी पसंतीच्या शहरांत पुणे चौथ्या स्थानी
{नोकरी शोधणाऱ्यांसाठी बंगळुरू सर्वात आवडते शहर आहे. चेन्नई दुसऱ्या, दिल्ली-एनसीआर तिसऱ्या, पुणे चौथ्या, हैदराबाद ५ व्या स्थानी.
{इंटर्नशिपसाठी सर्वाधिक आवडते राज्य आंध्र. राजस्थान दुसरे, झारखंड तिसरे, म. प्र. ८ वे.
{सर्वाधिक संगणक कौशल्ये असणाऱ्यांत राजस्थान पहिल्या, मध्य प्रदेश दुसऱ्या स्थानी.

बातम्या आणखी आहेत...