आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्फोट कसा घडवून आणला जाईल?:इलेक्ट्रिक शॉकचे बटण दाबून दत्ता करतील स्फोट, पाऊस फायद्याचा

नोएडा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोएडा येथील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार व बिल्डर्सच्या मिलीभगतचे प्रतीक बनलेल्या अवैध जुळ्या इमारती २८ ऑगस्टला उद्ध्वस्त केल्या जातील. या इमारती भारतीय ब्लास्टर चेतन दत्ता बटण दाबून उडवतील. ते डिफाइस कंपनीचे भारतीय ब्लास्टर आहेत. कंपनीने जानेवारी २०२० मध्ये केरळच्या मराडू इमारती पाडल्या आहेत.

स्फोट कसा घडवून आणला जाईल? या इमारती हाय सिसमिक झोनमध्ये आहेत. इथे ३७०० किलो स्फोटके लोड केली आहेत. येथील डायनॅमाइटचे सर्किट रविवारी सकाळी डिटोनेटरशी जोडले जातील. आधी बॉक्स चार्ज केला जाईल. नंतर बटण दाबले जाईल. सुमारे ९५०० डी लेअर्समध्ये करंट पोहोचेल व स्फोट होईल. १५ सेकंदात इमारती कोसळतील.

आसपासच्या इमारतींचा बचाव कसा करणार? स्फोट सुरक्षित असेल का? स्फोट १०० टक्के नियंत्रित असेल. आम्ही इमारतीपासून जवळपास ५०-७० मीटर दूर राहणार आहोत. कोणताच धोका नसेल. स्फोटाचे क्षेत्र लोखंडी जाळीच्या चार थरांनी व कपड्यांच्या दोन थरांनी झाकलेले आहे. त्यामुळे ढिगारे उडणार नाहीत. मात्र, धूळ पसरू शकते. ढिगारे हटवण्यासाठी तीन महिने लागतील.

स्फोट करत असताना पाऊस झाला तर? दत्ता म्हणाले, त्या दिवशी मुसळधार पाऊस व्हावा असेच आम्हाला वाटते. पावसामुळे स्फोटके किंवा स्फोटांवर कोणताच परिणाम होणार नाही. आसपासच्या लोकांसाठी पाऊस दिलासा देणाराच असेल. कारण स्फोटानंतर धुळीचे लोट दूरपर्यंत पसरतील.

आणखी एखाद्या कंपनीची मदत घेतली जात आहे? दोन्ही इमारती उद्ध्वस्त करण्यासाठी दक्षिण आफ्रिकन कंपनी जेट डिमोलिशनचे संचालक जो ब्रिकमॅन यांनीच या इमारतीचे ब्लास्ट डिझाइन तयार केले आहे. त्यांना या क्षेत्राचा जवळपास ४० वर्षांचा अनुभव आहे. ट्रिगर पॉइंटवर हजर असणारे ब्रिकमॅन हे दुसरे व्यक्ती असतील.

अशा प्रकारच्या स्फोटांसाठी एखादा कायदा आहे? देशात कायद्यानुसार स्फोटकांचा वापर जनतेच्या हितासाठी केला जात असेल तर त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी हजर असणे गरजेचे आहे. म्हणूनच कुठेही गर्दीवर नियंत्रण मिळवायचे असेल तर गोळीबाराचे आदेश एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याशिवाय देता येत नाहीत. इमारती उद्ध्वस्त करण्याबाबतीतही हेच नियम आहेत.

बातम्या आणखी आहेत...