आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंडरवर्ल्ड, हवाला रॅकेट आणि बेकायदा मालमत्तांप्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने मंगळवारी मुंबईत धडक कारवाई करीत एकाच वेळी अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. सन १९९३ च्या मुंबई बाॅम्बस्फोट मालिकेचा मास्टरमाइंड कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर, दिवंगत बहिण हसीना पारकर आणि दाऊदचा उजवा हात समजला जाणारा छाेटा शकील यांच्या दहा मालमत्तांचा यामध्ये समावेश आहे.
कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय तपास संस्थेने (एनआयए) दाऊद इब्राहिमसह इतरांविरोधात बेकायदा कारवाया प्रतिबंधक (युएपीए) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे.
एका भारतीय उद्योगपतीवर संशय
बेकायदा मालमत्तांच्या व्यवहाराबद्दलचे महत्त्वपूर्ण दस्तऐवज ईडीच्या हाती लागले असून एका भारतीय उद्योगपतीशी संबंधित आहेत. या उद्योगपतीच्या व्यवसायाचा पसारा भारतासह दुबईतही आहे. त्याशिवाय काही राजकीय व्यक्तींचे संशयास्पद व्यवहारही ईडीच्या रडारवर आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.