आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेरठमध्ये एका बापाने आपल्या 17 वर्षांच्या मुलीला मारण्याची सुपारी दिली होती. त्यांना मुलीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आला होता. 6 जुलैच्या संध्याकाळी त्यांना संशय आल्याने वडिलांनी मुलीला शिवीगाळ केली. नंतर तिला मारहाणही केली. आणि म्हणाले, आजनंतर घराबाहेर पडलीस तर मारून टाकीन, अशी धमकी दिली. याच रागातून मुलीने छतावरून उडी मारली. तिला उपचारासाठी मोदीपुरम येथील फ्युचर प्लस रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर वडिलांनी तिला मारण्याचा कट रचला.
पोटॅशियम क्लोराईड इंजेक्शन दिले
पोलिसांनी सांगितले की, मुलीचे वडील नवीन, सुपारी किलर नरेश आणि नर्स सोनिया यांना कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मुलीच्या वडिलांनी वॉर्ड बॉयला यासाठी सुपारी दिली होती. वॉर्ड बॉयने रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यासह बनावट डॉक्टर असल्याचे भासवून मुलीला पोटॅशियम क्लोराईडचे अतिप्रमाणात इंजेक्शन दिले. प्रेमप्रकरणातून आपल्या मुलीने टेरेसवरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वडिलांनी चौकशीत सांगितले.
रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले
7 जुलै रोजी सुपारी किलर नरेश हा तरुणीला विषारी इंजेक्शन देण्यासाठी पोहोचला होता. नर्स सोनियाने तिला इंजेक्शन दिले. तिची प्रकृती खालावू लागली. यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर नरेश हॉस्पिटलमधून पळाला. काहीवेळापूर्वी तो रितूच्या खोलीत दिसला होता. संशयावरून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नरेशला आणि नर्स सोनियाला पकडून पल्लवपुरम पोलिसांच्या ताब्यात दिले.
1 लाख रुपयात सुपारी
पल्लवपुरमचे निरीक्षक अविनाश अष्टवाल घटनास्थळी पोहोचले. नरेश आणि सोनियाला पकडले. नरेश आणि सोनिया यांनी पोलिसांना सांगितले की, मुलगी तिच्या प्रियकराशी बोलायची जे तिच्या कुटुंबीयांना आवडत नव्हते. सुपारी किलर नरेश याने सांगितले की, मुलीच्या वडिलांनी आपल्याला एक लाख रुपयांची सुपारी दिली होती. रोख रक्कमही पूर्ण देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सुपारी किलरजवळ सापडले तुटलेले इंजेक्शन
पल्लवपुरम पोलिस स्टेशनचे प्रभारी अवनीश अष्टवाल यांनी सांगितले की, आरोपी नर्स सोनिया आणि सुपारी किलर नरेश यांच्याकडून एक तुटलेले इंजेक्शन देखील सापडले आहे. हे इंजेक्शन पोटॅशियम क्लोराईडचे होते. हे इंजेक्शन ज्या ठिकाणाहून आणले होते त्याचाही शोध घेतला जात आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या एक लाख रुपयांच्या सुपारींपैकी 90 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. आधी दहा लाख रुपये किमतीची सुपारी असल्याची चर्चा होती, मात्र बोलणी झाल्यानंतर ती एक लाख रुपये ठरली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.