आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​एनआयएची दाऊद टोळीवर कारवाई सुरू:दाऊदचे दोन साथीदार एनआयएच्या अटकेत, 29 ठिकाणी छापेमारी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एनआयएची दाऊद टोळीवर कारवाई सुरूच असून दाऊदच्या २९ ठिकाणी छापे टाकल्यानंतर आता एनआयएने शुक्रवारी अबू बकर शेख व शब्बीर अबू बकर शेख या दोघांना मुंबईत अटक केली आहे. या दोघांचा दाऊद टोळीशी संबंध असल्याचा आरोप आहे. दाऊदसाठी अवैधरीत्या निधी जमवून हे दोघे अवैध कृत्यात सहभागी होते, असा एनआयएचा दावा आहे. सूत्रांनुसार, अशात एनआयएने टाकलेल्या छाप्यानंतर झालेल्या चौकशीत या दोघांची नावे समोर आली होती. शब्बीर याने छोटा शकील याच्याशी काही आर्थिक व्यवहार केला असल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले आहे .