आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NIAने केला डी-कंपनीच्या प्लॅनचा खुलासा:भारतात हल्ले करण्यासाठी दाऊदने विशेष युनिट तयार केले, दिल्ली आणि मुंबईत बडे नेते आणि सेलिब्रिटींना केले टार्गेट

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय गुप्तचर यंत्रणांना डी-गँगच्या कटाची माहिती मिळाली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आपल्या एफआयआरमध्ये या कटाचा उल्लेख केला आहे. एनआयएच्या म्हणण्यानुसार, डी-गँगचा म्होरक्या आणि भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊदने भारतात हल्ले करण्यासाठी एक विशेष युनिट तयार केले आहे. ज्यांचे टार्गेट मोठे नेते आणि सेलिब्रिटी आहेत.

हिंसाचाराला खतपाणी घालणे हा हेतू
एफआयआरनुसार दाऊदला त्याच्या विशेष युनिटच्या माध्यमातून भारतात हल्ले करायचे आहेत आणि त्याचे लक्ष दिल्ली आणि मुंबई आहे. येथील बडे नेते आणि मोठया हस्ती त्यांचे टार्गेट आहेत. स्फोटक आणि प्राणघातक शस्त्रांनी सज्ज असलेल्या या युनिटच्या माध्यमातून दाऊदला भारतातील अनेक भागात हल्ले करायचे आहेत. तपास संस्थेच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यांचा उद्देश भारताच्या विविध भागात हिंसाचार भडकावण्याचा आहे.

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर ईडीच्या ताब्यात
एनआयएच्या खुलाशाच्या एक दिवस आधी शुक्रवारी ईडीने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याला ताब्यात घेतले आहे. मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात, ईडी इक्बालची पुढील 7 दिवस म्हणजे 24 फेब्रुवारीपर्यंत चौकशी करेल. ईडीने अलीकडेच दाऊद आणि त्याच्या जवळच्या साथीदारांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार हे लोक दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवत आहेत.

इक्बालने बिल्डरकडे पैशांची मागणी केली होती
ईडीचे सहाय्यक संचालक डीसी नाहक यांनी सांगितले की, सप्टेंबर 2017 मध्ये एका बिल्डरच्या तक्रारीवरून इक्बाल कासकर, मुमताज अजाज शेख, इसरार जमील सय्यद आणि इतर काही जणांविरुद्ध वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. इक्बाल आणि इतरांनी त्याच्याकडून वसुलीची रक्कम मागितल्याचे एका बिल्डरने तक्रारीत म्हटले आहे. 2015 मध्ये बिल्डरचा एक दलाल सय्यदला भेटला. तो दाऊदचा भाऊ असल्याचे सय्यदने सांगितले होते. त्याने इक्बालला बिल्डरशी बोलायला लावले आणि वसुलीची रक्कम न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

बातम्या आणखी आहेत...