आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदाच्या उन्हाळ्यात गर्मी वाढणार आहे. मार्च महिन्यातच देशातील अनेक राज्यात मे महिन्यासारखी परिस्थिती तयार झाली आहे. हीटव्हेव तज्ज्ञ नरेश कुमार यांनी सांगितले की, याप्रकारची गरम हवा पाकिस्तानातून येत आहे. पाकिस्तानमधील काही भागात पारा 45 डिग्रीपर्यंत पोहचला आहे. या हीटव्हेव राजस्थानमार्गे भारतातील मैदानी क्षेत्रात येत आहेत.
इंडियन मीटियरोलॉजिकल डिपार्टमेंट (IMD) नेदेखील एप्रिल ते जूनदरम्यान गर्मी वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. राजस्थानसह काही राज्यांमध्ये तापमान 40 डिग्रीपेक्षा जास्त जात आहे. IMD ने राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशासह 10 राज्यांमध्ये 3 एप्रिलला हीटव्हेवमुळे 'लू'चा(तापेचा) अलर्ट जारी केला आहे. IMD चे डायरेक्टर जनरल मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले की, राजस्थानमध्ये वाहणाऱ्या हीटव्हेवमुळे इतर मैदानी क्षेत्रांमध्येही तापमान वाढवणार आहेत. यापूर्वी दिल्लीमध्ये मॅक्सिमम टेम्परेचरचा 76 वर्षांचा रेकॉर्ड या आधीच ब्रेक झाला आहे. दिल्लीमध्यो सोमवारी तापमान 40.1 डिग्री सेल्सियसवर गेले होते.
राजस्थानातील 8 आणि मध्यप्रदेशातील 4 शहरांमध्ये तापमान 40 पेक्षा जास्त
राजस्थानमधील बाडमेर, जेसलमेर, जोधपुर, बीकानेर, माधोपुर, चित्तौडगड, चुरू आणि फलौदीमध्ये तापमान 40 डिग्रीपेक्षा जास्त झाले आहे. या परिसरांमध्ये रात्रीचे तापमान 20 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त आहे. मध्यप्रदेशात मार्च महिन्यातच मे महिन्यासारखी परिस्थिती बनली आहे. भोपाळसह 4 शहरांमध्ये तापमान 40 डिग्रीपेक्षा जास्त झाले आहे. भोपाळमध्ये 41 डिग्री, इंदुर 40.2 डिग्री, जबलपुर 40.5 डिग्री आणि ग्वालियरमध्ये 40.8 डिग्री तापमानाची नोंद झाली आहे.
UP मध्ये गर्मीचा 10 वर्षांचा रेकॉर्ड मोडला
गर्मीने उत्तर प्रदेशातही परिस्तिती बिघडवली आहे. येथे मार्चमध्ये दुसऱ्यांना दहा वर्षांचा रेकॉर्ड तुटला आहे. उत्तर प्रदेशातील झांसीमध्ये सर्वाधिक गर्मी पडली. येथे 42.3 डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय, हिमाचल प्रदेशातही तापमान वाढले आहे. हिमाचल प्रदेशातील ऊनामध्ये तापमान 34.3 डिग्री आणि शिमलामध्ये 23.2 डिग्रीवर पोहचले. हे तापमान सामान्यपेक्षा 6 डिग्री ज्यास्त आहे.
पाकिस्तानातून येणाऱ्या गरम हवेचा परिणाम या राज्यांमध्ये दिसले
राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, झारखंड,पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, पद्दुचेरी आणि ओडिसा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.