आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर प्रदेशचे मंत्री दयाशंकर सिंह व त्यांच्या पत्नी माजी मंत्री स्वाती सिंह यांचा मार्ग अखेर वेगळा झाला आहे. लखनऊच्या फॅमिली कोर्टाने या दोघांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली. स्वाती सिंह यांनी 30 सप्टेंबर 2022 च्या फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. तेव्हा दयाशंकर सिंह उपस्थित नव्हते. या घटस्फोटासह या दोघांचे 22 वर्षांचे वैवाहिक संबंध संपुष्टात आलेत.
दयाशंकर सिंह व स्वाती सिंह यांच्यात वाद होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2012 मध्येही त्यांच्यातील वाद कोर्टात पोहोचला होता. तेव्हाही स्वाती सिंह यांनी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पण 2017 मध्ये मंत्रीपदी निवड झाल्यामुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर 2018 मध्ये ही केस गुंडाळण्यात आली.
अखेर घटस्फोटाचे कारण काय?
दयाशंकर व स्वाती दोघेही उत्तर प्रदेशच्या राजकारणाचे चर्चित चेहरे आहेत. स्वाती गत योगी सरकारमध्ये मंत्री होत्या. तर यावेळी दयाशंकर आहेत. 2022 च्या विधानसभा निवडणुकीपासून या दोघांच्या संबंधांत वितुष्ट आले होते.
कुटुंब व भाजपशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, पती-पत्नीला सरोजनीनगर या एकाच मतदार संघातून उमेदवारी हवी होती. कारण - ही भाजपचे सेफ सीट होती. 2017 मध्ये स्वाती सिंह यांनी प्रथमच या मतदार संघातून निवडणूक लढून जिंकली होती. एकमेकांविरोधातील संघर्षात स्वाती सिंह यांचे तिकीट कापले गेले. दयाशंकर सिंह यांना भाजपने बलियातून उमेदवारी दिली.
दयाशंकर सिंह व स्वाती यांचे लव्ह मॅरेज होते. पण त्यांच्यात वेळोवेळी संघर्ष होत गेला. 2008 मध्ये स्वाती सिंह यांनी पतीविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला. त्यांचा यासंबंधीचा एक ऑडिओही व्हायरल झाला होता. त्यात स्वाती, दयाशंकर यांच्यावर गंभीर आरोप करताना व माझे लग्न अत्यंत वाईट व्यक्तीशी झाल्याचे ऐकावयास येत होत्या.
पतीपासून वेगळ्या राहत होत्या स्वाती
एवढेच नाही तर सप्टेंबर 2022 मध्ये त्यांनी न्यायालयात सांगितले होते की, त्या गत 4 वर्षांपासून पतीपासून वेगळ्या राहत आहेत. दुसरीकडे, दयाशंकर यांनीही घटस्फोटावरील आपले मौन सोडले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "हा एकतर्फी घटस्फोट आहे. ना मी अर्ज केला, ना कोर्टात गेलो. पण मी या मुद्द्यावर पुढे जाणार नाही. त्यांच्या (स्वातीची) राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे हे घडले आहे."
स्वाती व दयाशंकर यांचे अफेअर व लव्ह मॅरेज कसे झाले यापूर्वी वाचा 2016 मध्ये स्वाती सिंह यांची राजकारणात एंट्री कशी झाली...
पक्षातून पतीचे निलंबन, स्वातीचा राजकारणात प्रवेश
गोष्ट 2016 ची आहे. भाजप नेते दयाशंकर सिंह यांनी बसप सुप्रीमो मायावतींविषयी वादग्रस्त विधान केले. त्यांनी मायावतींवर तिकीट विकण्याचा आरोप करत अपशब्द वापरले. त्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका सुरू झाली. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी वाढली. भाजपच्या अनेक नेत्यांनीही दयाशंकर यांच्या विधानाचा निषेध केला.
त्यावेळी नसीमुद्दीन सिद्दीकी बसपचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. ते आपल्या काही समर्थकांसह लखनऊच्या हजरतगंज चौकात निदर्शने करण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांनी दयाशंकर यांच्या चुकीचा पुनरावृत्ती करत त्यांच्या आई, पत्नी व मुलीविषयी अपशब्द वापरले. बस येथूनच स्वातींची राजकारणात एंट्री झाली.
स्वाती सिंह यांनी नसीमुद्दीन यांच्या विधानावर संताप व्यक्त केला. दयाशंकर आपल्या विधानामुळे बॅकफूटवर गेले. पण त्यांच्या समर्थनार्थ स्वाती मैदानात उतरल्या. त्यांनी स्वतः मोर्चा सांभाळला. त्यांनी थेट मायावतींविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
दयाशंकर व नसीमुद्दीन यांच्या विधानांवर वेगवेगळी कारवाई झाली. एकीकडे भाजपने दयाशंकर यांना 6 वर्षांसाठी निलंबित केले. तर दुसरीकडे, दयाशंकर सिंह यांच्या आईने दाखल केलेल्या एफआयआरनुसार नसीमुद्दीन यांना तुरुंगात जावे लागले. भाजपने दयाशंकर यांची रिप्लेसमेंट म्हणून स्वाती सिंह यांना राजकारणात आणले. त्यांची भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. अशा प्रकारे स्वाती राजकारणात आल्या. 2017 मध्ये प्रथमच स्वाती यांनी भाजपच्या सेफ सीट सरोजनीनगर येथून निवडणूक लढवली. त्यानंतर त्या महिला कल्याण विभागाच्या मंत्री बनल्या.
आता वाचा स्वाती व दयाशंकर यांच्या अफेअर व लव्ह मॅरेजची कहाणी...
दयाशंकर विद्यार्थी नेते, तर स्वाती MBA करत होत्या
स्वाती सिंह यांचे कुटुंब मूळचे यूपीच्या बलियाचे आहे. त्यांचे वडील स्टील सिटी बोकारोमध्ये नोकरी करत होते. त्यामुळे स्वातीचा जन्म व पालनपोषण तिथेच झाले. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वाती पुढील शिक्षणासाठी लखनौला गेल्या. लखनौ विद्यापीठात त्या पहिल्यांदा दयाशंकर यांना भेटल्या.
दयाशंकर त्यावेळी अभाविपचे सक्रीय राजकारण करत होते. स्वातीही हळूहळू राजकारणात आल्या. राजकारणाचे डावपेच शिकत असताना दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोघांनीही कुटुंबीयांच्या परवानगीने प्रेमविवाह केला. त्यानंतर स्वातींनी लखनौ विद्यापीठात पीएचडीसाठी प्रवेश घेतला. येथून हे दोघेही एकत्र शिक्षण घेऊ लागले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.