आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकलम ३७० हटवून केंद्रशासित प्रदेश केल्यानंतर जम्मू-काश्मिरात जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी) पहिल्या निवडणुकीचे निकाल मंगळवारी रात्री जाहीर झाले. निकाल व कलांत ७ प्रादेशिक पक्षांची आघाडी पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन (पीएजीडी) सर्वात मोठी विजेती ठरली. मात्र भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. गुपकार आघाडीने एकूण ९९ जागा, तर भाजपने ७४ जागा जिंकल्या.
काँग्रेसला फक्त २२ जागांवर समाधान मानावे लागले. तथापि, काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी गुपकारला पाठिंबा देण्याचे सूतोवाच केलेले आहे. यामुळे गुपकारला २० पैकी १३ जिल्ह्यांत अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. भाजपला ५ जिल्ह्यांच्या अध्यक्षपदावर समाधान मानावे लागणार आहे.
निकाल भाजपसाठी डोळे उघडणारे
निकाल आणि कल भाजपसाठी डोळे उघडणारे आहेत. लोकांनी राज्याचा विशेष दर्जा हटवण्याचा निर्णय फेटाळून लावला आहे. निकाल गुपकारसाठी मैलाचा दगड ठरतील. - उमर अब्दुल्ला, नॅशनल कॉन्फरन्स
अध्यक्षच ‘सरकार’
डीडीसीच्या २० अध्यक्षांच्या माध्यमातून यंदा १ लाख कोटी रुपये खर्च होतील. सध्या येथे सरकार नाही, यामुळे आता हेच अध्यक्ष ‘सरकार’ असतील.
निकाल
गुपकार : ९९
भाजप : ७४
काँग्रेस : २२
इतर : ८५
एकूण : २८०
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.