आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सोरायसिसच्या औषधाने कोरोनावर उपचार:त्वचेच्या उपचारात वापरण्यात येणाऱ्या इटोलीजुमॅबला कोविडसाठी सशर्त परवानगी मिळाली

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीजीसीआय)ने कोरोनाव्हायरस उपचारासाठी त्वचेशी संबंधित आजार (सोरायसिस)च्या इटोलीजुमॅब इंजेक्शनला सशर्त परवानगी दिली आहे. या इंजेक्शनचा वापर अशा रुग्णांसाठी केला जाईल जे संक्रमित झाल्यानंतर मेडिकल टर्म एआरडीएसने पीडित आहेत. या स्थितीमध्ये श्वसनाशी संबंधित अडचणी निर्माण होतात.

काय फायदा होईल

ड्रग रेग्युलेटर डॉक्टर व्हीजी सोमाणी यांनी शुक्रवारी या इंजेक्शनच्या वापरासाठी परवानगी दिली. म्हणजेच याचा वापर आता कोविड-19 च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकेल. एआरडीएसच्या रुग्णांना फुप्फुसांमध्ये त्रास होतो. यामुळे श्वास घेणे अवघड जाते आणि अनेकवेळा खूप जळजळही होते. इटोलीजुमॅब इंजेक्शन बायोकॉन लिमिटेड द्वारे तयार करण्यात आले आहे. याचा वापर प्लेग किंवा सोरायसिसच्या उपचारात केला जातो. मागील वर्षीच याला अप्रूव्हल मिळाले होते.

0