आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीच्या महाविद्यालयांतील कार्यक्रमांत छेडछाडीच्या घटना वाढल्या:महिला आयोगाने पोलिस-विद्यापीठांना पाठवली नोटिस

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीच्या कॉलेज फेस्टदरम्यान सातत्याने मुलींसोबत छेडछाडीच्या घटना समोर आल्यानंतर महिला आयोगाने दिल्ली पोलिस आणि विद्यापीठांना नोटिस पाठवली आहे. आयोगाने त्यांना अशा घटना रोखण्यासाठीचा अॅक्शन प्लॅन घेऊन 6 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता हजर होण्यास सांगितले आहे.

वास्तविक, 25 मार्च रोजी इंद्रप्रस्थ कॉलेज फेस्टदरम्यान काही मुले कॉलेजमध्ये आली आणि मुलींसोबत छेडछाड केली. या मुलांनी मुलींच्या वसतीगृहातही शिरण्याचा प्रयत्न केला. 29 मार्च रोजी महिला आयोगाने याची दखल घेत पोलिस आणि कॉलेज प्रिन्सिपलना नोटिस जारी केली होती.

पोलिस आणि युनिव्हर्सिटींनी ठरवावे अशा घटना पुन्हा होऊ नये

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल म्हणाल्या की या घटना खूप दुर्दैवी आहेत. आम्ही आधीही अशी अनेक प्रकरणे बघितली आहेत. ज्यात असामाजिक घटकांद्वारे विद्यार्थिनींना त्रास दिला जातो. आरोपींना लगेच अटक झाली पाहिजे. सुरक्षेतील त्रुटीसाठी जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई व्हायला हवी. दिल्ली पोलिस आणि विद्यापीठांनी एकत्र येत ठरवले पाहिजे की अशा घटना पुन्हा घडू नये. ​​​​​

तमिळनाडूत नृत्य प्रशिक्षकाने माजी विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केले

इकडे, तमिळनाडूची राजधानी चेन्नईतील कला क्षेत्र फाऊंडेशनमधील एका नृत्य प्रशिक्षकाला माजी विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात आयपीसीचे कलम 354 आणि 509 अंतर्गत प्रकरण नोंदवण्यात आले आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष ए एस कुमारींनी कला फाऊंडेशनमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींची भेट घेतल्यावर सुमारे 100 तक्रारी मिळाल्या होत्या.

वास्तविक, विद्यार्थ्यांनी गुरूवारी लैंगिक छळाच्या चार आरोपी शिक्षकांच्या निलंबनाच्या मागणीवरून आंदोलन सुरू केले होते. तथापि, कला फाऊंडेशनने मार्चमध्ये म्हटले होते की त्यांच्या इंटर्नल कमिटीला प्रकरणात कोणतेही पुरावे आढळले नाही. तर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी राज्याच्या विधानसभेत मुद्दा उपस्थित झाल्यावर कारवाईचे आश्वासन दिले होते.

ही बातमीही वाचा...

भाजपने रिलीज केला काँग्रेस फाइल्सचा दुसरा भाग:व्हिडिओत आरोप- पेंटिंगमधून 2 कोटी कमावले, हे पैसे सोनियांच्या उपचारांवर खर्च केले