आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dead Bodies Lay In Buxar On The Banks Of The Ganges, Now There Is A Possibility Of Epidemic In The Area; News And Live Updates

बिहार-यूपी सीमेवर कोरोनाचा कहर:बक्सरमध्ये गंगेच्या काठावर पाण्यात दिसले 40 मृतदेह, प्रशासनाचा दावा- हे मृतदेह यूपीतून वाहत आले

बक्सरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 7 मृतदेह जाळले, 16 मृतदेहांना गंगेमध्ये वाहिले

कोरोनाच्या वाढत्या उद्रेकाबरोबर मृतांचा आकडादेखील वाढतच आहे. दरम्यान, मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत जागाही उरलेली नाही. अशावेळी मृतदेहांच्या नातेवाईकांना रांगेत तासनतास उभे राहावे लागत आहे. स्मशानभूमीत 24 तास चिता जळत असून सरणाअभावी अर्धवटच अंत्यसंस्कार केले जात आहे. अशातच बिहारमधील बक्सरमधून मानवी समुहाला लाजवेल असे हृदयद्रावक चित्र समोर येत आहे. यूपीच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यात सोमवारी गंगा नदीकाठी 40 मृतदेह वाहताना दिसले.

बक्सर हे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्वनी कुमार चौबे यांचा मतदार संघ आहे. प्रशासनाने सांगितले की, उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद व वाराणसी येथून हे मृतदेह वाहत आले आहेत.

खेडे गावांत एक-दीड महिन्यांपासून वाढत आहे मृतांचा आकडा
बक्सरमधील चरित्रवन येथील लोकांचे म्हणणे आहे की, आजूबाजूच्‍या गावात गेल्या एक-दीड महिन्यांपासून अचानकपणे मृतांचा आकडा वाढला आहे. सोमवारी चरित्रवनमधील स्मशानभूमीत लोकांना जाळण्यासाठी जागा उरली नाही. दरम्यान, यामधील जास्तीत जास्त रुग्ण खोकला आणि तापीचे होते. चौसा स्मशानभूमीत येणार्‍या बहुतेक मृतदेहांना गंगेमध्ये टाकण्यात येत आहे. यामधील शेकडो मृतदेह गंगा नदीच्या किनार्‍यावर सडत आहेत.

चौसा स्मशानभूमीत 24 तास जळत आहे मृतदेह
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांसोबत मृत्यूंचा आकडादेखील वाढत आहे. सरकारी आकडा आणि वास्तवातील आकड्यांमध्ये मोठी तफावत असल्याचे अनेक वेळा आढळून आले आहे. अशावेळी चरित्रवन आणि चौसा स्मशानभूमीत 24 तास मृतदेह जळत असून मृतदेहांची रांग लागलेली आहे. यापूर्वी चौसा स्मशानभूमीत प्रतिदिन 2 ते 5 मृतदेह जळत होते. परंतु, आता तेथे 40 ते 50 मृतदेह जळत आहे. बिहार जिल्ह्यातील बक्सरमध्येदेखील हा आकडा प्रतिदिन 90 च्या घरात पोहचला आहे.

7 मृतदेह जाळले, 16 मृतदेहांना गंगेमध्ये वाहिले
चरित्रवन स्मशानभूमीत एकावेळी दहापेक्षा जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात असून येथे दिवस-रात्र चिता जळत आहेत. रविवारी, बक्सरमध्ये 76 मृतदेहांची अधिकृत नोंद झाली होती. परंतु, तेथे 100 लोकांवर अंत्यसंस्कार केले जात आहे. स्मशानभूमीत दररोज 20 हून अधिक लोक नोंदणी देखील करत नाहीयेत. चौसामध्येही 25 मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यामधील 7 मृतदेहांना जाळले तर इतर 16 मृतदेहांना नदीत वाहून दिले आहे.

बक्सरमध्ये दररोज 100 लोकांवर अंत्यसंस्कार केले जात असून यामध्ये 76 मृतदेहांची अधिकृत नोंद होत आहे. परंतु, 20 हून अधिक लोक नोंदणी देखील करत नाहीयेत.
बक्सरमध्ये दररोज 100 लोकांवर अंत्यसंस्कार केले जात असून यामध्ये 76 मृतदेहांची अधिकृत नोंद होत आहे. परंतु, 20 हून अधिक लोक नोंदणी देखील करत नाहीयेत.
बातम्या आणखी आहेत...