आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माणुसकीला लाजवणारी घटना:राज्यातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात स्ट्रेचरवर पडलेल्या मृतदेहाचा अंत्यविधीच्या प्रतीक्षेत झाला सांगाडा, दुर्गंधीनंतरही लोकांचे दुर्लक्ष

इंदुर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एमवायएच हॉस्पीटलच्या मॉर्चरी रुममधील ही बॉडी 10 दिवस जुनी आहे
  • प्रकरण समोर आल्यानंतर तात्काळ मृतदेहाला हॉस्पीटलमधून हटवण्यात आले

मध्य प्रदेशातील सर्वात मोठे सरकारी हॉस्पीटल महाराज यशवंत राव हॉस्पीटल (एमवायएच) मध्ये माणुसकीला लाजवणारे चित्र समोर आले आहे. येथील मॉर्चरी रुममध्ये स्ट्रेचरवर ठेवलेला एक मृतदेह अंत्यविधीच्या प्रतीक्षेत सांगाडा बनला. प्रकरण समोर आल्यानंतर हॉस्पीटल अधिकाऱ्यांनी तात्काळ बॉडीला तेथून हलवले. इतकच काय, तर मृतदेहाचा घाण वास सुटल्यावरही कोणी त्याकडे लक्ष दिले नाही. रुग्णालय अधीक्षकांनी सांगितले की, दोषींवर योग्य कारवाई केली जाईल.

एमवायएच आपल्या हलगर्जीपणामुळे नेहमी चर्चेत असते. ही संबंधित बॉडी दहा दिवसांपूर्वीची असल्याची माहिती आहे. परंतू, बॉडी कुणाची आहे आणि हॉस्पीटलमध्ये केव्हा आणली, याबाबत कुणीच काही सांगायला तयार नाही.स्ट्रेचरवर शरीराचा सांगाडा होण्यामुळे इतकी मोठी चूक कशी झाली आणि कोणाचा दोष आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हॉस्पिटलमध्ये आहेत 16 फ्रीजर

या हॉस्पीटलमध्ये 16 फ्रीजर आहे. पोलिसांना एखादा अज्ञान मृतदेह सापडला, तर त्याला याच हॉस्पीटलमध्ये पाठवले जाते. पोस्टमॉर्टम (पीएम)नंतर मृतदेहाचा पालिकेद्वारे अंत्यविधी केला जातो. मिळालेल्या माहितीनुसार, सांगाडा बनलेल्या शरीराचे पोस्ट मॉर्टम झाले नाही. बॉडी हॉस्पीटलमध्ये आणल्यापासून तशीच पडलेली होती.

अज्ञाताची बॉडी एक आठवडा ठेवू शकतोत

एमवायएच अधीक्षक डॉ. पीएस ठाकुर यांचे म्हणने आहे की, बॉडी दहा दिवसांपूर्वीची आहे. अज्ञाताची बॉडी आम्ही एक आठवडा ठेवतो. बॉडीच्या अंत्यविधीसाठी पालिका प्रशासनाला कॉल केला का नाही, यासाठी कॅजुअल्टी इंचार्जला नोटिस देण्यात आली आहे. चौकशी करुन दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.