आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उत्तर प्रदेशच्या भदोही जिल्ह्यात 17 वर्षीय मुलीचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. तसेच, ओळख लपवण्यासाठी तेजाबने शरीर जाळण्यात आले आहे. मुलीच्या कुटुंबियांनी बलात्कारानंरत खून केल्याचा संशय व्यक्त केला आहे.
बुधवारी मुलीचा मृतदेह वरुणा नदीत सापडला. कुटुंबियांनी अंगावरील जीन्स पॅन्टने ओळख पटवली. 17 ऑगस्टला मुलगी नदी किनारी जनावरे चारण्यासाठी गेली होती. त्यानंतर 19 ऑगस्टला तिचा मृतदेह सापडला. याबाबत एसपी राम बदन सिंह यांनी सांगितले की, तपासासाठी चार पथके स्थापन करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दौन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली, पण ठोस पुराव हाती लागला नाही. 19 ऑगस्टला सकाळी वरुणा नदीत मुलीचा मृतदेह सापडला. चेहरा जळाला होता, कपडे अस्तव्यस्त होते आणि पाण्यात राहून शरीर फुगले होते. त्यामुळे, मृत्यू नेमका कसा झाला, हे अद्याप समजू शकले नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.