आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dead Cows Infested With Lumpy Are Thrown In The Open...difficult To Stay Within Five Km Due To Stench

मौन चीत्कार...धरतीच्या कुशीत गाेमाता:लम्पीने बाधित मृत गाई खुल्यावर फेकल्या जाताहेत.. परिसरात दुर्गंधी

बिकानेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानात लम्पी संक्रमणाने थैमान घातले आहे. बिकानेरमधील हे छायाचित्र त्याचे माेठे उदाहरण. लम्पीमुळे गाईंचे मृत्यू वाढले आहेत. राज्यातील ६ हजार एवढे शहरी क्षेत्र व जिल्ह्यात सुमारे ५० हजारांहून जास्त गाेवंशातील जनावरांनी प्राण गमावले आहेत.

लाेक मृत पशूंना बिकानेरपासून १० किलाेमीटरवरील जाेडबीड येथील डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला उघड्यावर फेकून देत आहेत. ५ हजार ६४६ हेक्टरवरील या वनक्षेत्रात मृत पशूंचा माैन चीत्कार एेकू येत आहे. पाच किमी भागात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे या परिसरात थांबणेही कठीण आहे. त्यामुळे गाढवाला, सुरधना, किरचू, आंबासर, नेनाें का बास, गीगासरमधील सुमारे ५० हजार लाेकसंख्या त्रस्त झाली आहे.

10 लाख गाेवंशाला राज्यात आतापर्यंत लम्पीचा संसर्ग झाला

43 हजारांहून जास्त मृत्यू झाल्याची सरकारी आकडेवारी.

बातम्या आणखी आहेत...