आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dearness Allowance Increased By 4 Per Cent To 42 Per Cent Possible; Proposal To The Union Cabinet

कर्मचारी-निवृत्तिधारकांचा महागाई भत्ता:महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवून 42 टक्के शक्य;  केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकार एक काेटीहून जास्त कर्मचारी-निवृत्तिधारकांचा महागाई भत्ता (डीए) ३८ टक्क्यांनी वाढून ४२ टक्के करू शकते. महागाई भत्त्याची गणना दरमहिन्याला लेबर ब्यूराेच्या वतीने आैद्याेगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे केली जाते. लेबर ब्यूराे ही कामगार व राेजगार मंत्रालयाची शाखा आहे . आॅल इंडिया रेल्वेमन फेडरेशनचे सरचिटणीस शिव गाेपाल मिश्रा म्हणाले, डिसेंबर २०२२ चे सीपीआय-आयडब्ल्यूची आकडेवारी ३१ जानेवारी २०२३ मध्ये जाहीर झाली. त्याच्या आधारे महागाई भत्त्यात ४.२३ टक्के वाढ हाेईल.

परंतु सरकार डीएमध्ये दशांशानंतरच्या अंकांना समाविष्ट करत नाही. त्यामुळे डीए ४ टक्क्यांनी वाढून ४२ टक्के हाेऊ शकताे. सध्या ताे ३८ टक्के आहे.

अर्थ मंत्रालय वाढीचा प्रस्ताव तयार करेल. त्यात डीएमध्ये वाढ झाल्यानंतर पडणाऱ्या आर्थिक बाेजाचाही उल्लेख असेल. प्रस्तावाला मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळासमाेर मांडले जाईल. डीएमधील वाढ जानेवारी २०२३ पासून लागू हाेईल.

बातम्या आणखी आहेत...