आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Death Certificate, Inheritance Documents Are Required To Close The Social Media Account

सोशल मीडियावर लाखो मृतांचा डेटा:अकाउंट बंद करण्यासाठी मृत्युपत्र, वारसा हक्क कागदपत्रे हवी

मुकेश कौशिक | नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हर्च्युअल वारसदार कोण? डेटा कसा सुरक्षित राहू शकेल ? त्यावर विधेयक आणण्याचा विचार

कोरोनाने व्हर्च्युअल जगासमोर एक विचित्र स्थिती निर्माण केली आहे. महामारीत लाखो लोकांनी प्राण गमावले. परंतु सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर त्यांची प्रोफाईल सहजपणे सापडते. मृत्यूनंतरही अकाउंटची जबाबदारी सांभाळणे किंवा बंद करण्याची व्यवस्था आहे. परंतु ही प्रक्रिया सोपी नाही. एखाद्या मृत व्यक्तीचे ट्विटर किंवा फेसबुक प्रोफाइलला स्मरणार्थ अकाउंटमध्ये रुपांतरित करता येऊ शकते. फेसबुकच्या धोरणानुसार व्यक्तीने सेटिंगमध्ये वारशासाठी संपर्क दिलेला असल्यास तो अकाउंटला संचलित करू शकतो. म्हणूनच आता मृतांच्या व्हर्च्युअल संपत्तीचा वारसदार कोण असेल? त्यांचा डेटा कसा सुरक्षित राहू शकेल. डेटा संरक्षण विधेयकावरील चर्चेत एक खासदार म्हणाले, या मुद्यावर एक समितीत अनेकवेळा चर्चा झाली होती. डेटा संरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विराग गुप्त यांनी एक प्रश्न उपस्थित केला. अकाउंट तयार करताना केवायसी विचारले जात नाही. मग ते रद्द करण्यासाठी अशा प्रकारच्या नियमांची गरज काय?

मेमोरियल अकाउंट म्हणून लोक व्हर्च्युअल वारसा संरक्षित

  • ट्विटर अकाउंट रद्द करण्याची विनंती केल्यानंतर इमेल येतो. त्यात आेळखपत्र, मृत्यू प्रमाणपत्राची प्रत व इतर माहिती मागवली जाते. त्याच्या पडताळणीनंतर अकाउंट डिलिट केले जाते.
  • फेसबुकवरील अकाउंट हटवण्यासाठी पुढील एका कागदपत्राची गरज भासते. मृत्यू प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी, पॉवर ऑफ अटर्नी, अॅटेस्ट लेटर इत्यादी कागदपत्रे द्यावी लागतात.
  • टीव्ही अँकर रोहित सरदानाचे सोशल अकाउंट त्यांचे कुटुंब सांभाळत आहे. पत्नी प्रमिलाने तत्काळ पतीच्या व्हर्च्युअल वारसा सांभाळण्यास सुरूवात केली.
  • माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे ट्विटर हँडर मुलगी बांसुरी सांभाळते. ते सतत अपडेट असते. ते मेमोरियल अकाउंट असल्याचे स्पष्ट नमूद केलेले आहे.
बातम्या आणखी आहेत...