आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Death In Police Custody On Tuesday Night, Was Arrested While Roaming In Tajganj Area After Getting Shaved, Force Deployed Due To Apprehension Of Ruckus

प्रियंका पोलिसांच्या ताब्यात:आग्र्यामध्ये पोलिस कस्टडीत मृत स्वच्छता कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जात होत्या प्रियंका गांधी, लखनऊ पोलिसांनी घेतले ताब्यात

आग्राएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रियंका 17 दिवसांत दुसऱ्यांदा पोलिस कोठडीत

आग्रा येथील पोलिस कोठडीत मृत्यू पावलेल्या सफाई कामगार अरुण वाल्मिकी यांच्या मृत्यूवरून राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी पीडितच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आग्र्याला जात होत्या, परंतु आग्रा एक्सप्रेस वेवरील टोल प्लाझावर त्यांना थांबवण्यात आले. लखनऊ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

प्रियंका म्हणाल्या की, कोणाच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरातील कुटुंबीयांना भेटल्याने कायदा सुव्यवस्था कशी बिघडू शकते? तुम्हाला खुश करण्यासाठी, मी लखनऊच्या गेस्ट हाऊसमध्ये आरामात बसून राहू का? असा सवालही प्रियंकांनी केला आहे. पोलिस कोठडीत एखाद्याला मारहाण करून मारुन टाकणे हा कुठला न्याय आहे? प्रियंका म्हणाल्या की मी जिथे जाते तिथे रोखले जाते, मी रेस्टॉरंटमध्ये बसून राहू का.

प्रियंका 17 दिवसांत दुसऱ्यांदा पोलिस कोठडीत
यापूर्वी 3 ऑक्टोबर रोजी प्रियंका यांना लखीमपूर खेरी हिंसाचारानंतर एका शेतकरी कुटुंबाला भेटण्याचा प्रयत्न करताना ताब्यात घेण्यात आले होते. नंतर पोलिसांनी त्यांना 30 तासांच्या कोठडीनंतर अटक केली. मात्र, 5 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा त्याची सुटका करण्यात आली.

पोलिस म्हणाले - आग्रामध्ये कलम 144 लागू
यावेळी पोलिसांच्या कारवाईवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्याशी बाचाबाची आणि हाणामारी झाली. एडीसीपी सेंट्रल राजेश श्रीवास्तव यांनी लखनौ आणि आग्रामध्ये कलम 144 लागू केल्याचा हवाला दिला. तेथे जाण्याने कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...