आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनच्‍या राणी एलिझाबेथ यांचे निधन:स्कॉटलंडच्या बालमोरल कॅसलमध्ये 96 वर्षीय राणीने घेतला अखेरचा श्वास, राजेपदी चार्ल्स

स्कॉटलंड21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बकिंगहॅम पॅलेसने महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाची घोषणा केली आहे. एलिझाबेथ ही ब्रिटनची सर्वात जास्त काळ सत्ता सांभाळणारी सम्राज्ञी होती. एलिझाबेथ यांचे आज दुपारी बालमोरल येथे निधन झाले. त्या 96 वर्षांच्या होत्या. त्‍या सत्तर वर्षे ब्रिटनच्‍या सम्राज्ञी होत्‍या.

डॉक्टरांच्या देखरेखीखाली होत्‍या राणी एलिझाबेथ

गुरुवारी दुपारी त्यांच्या प्रकृती अस्‍वथ असल्‍याची बातमी आली होती. त्यानंतर त्‍या डॉक्टरांच्या देखरेखीखाली होत्‍या. राजघराण्याने सांगितले होते की, राणी episodic mobility या आजाराने ग्रस्‍त होत्‍या. या आजारात रुग्णाला उभे राहण्यास व चालण्यास त्रास होतो. 19 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राणीचे कुटुंबीय बालमोरल वाड्यात पोहोचले आहेत. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, प्रिन्स विल्यम, अँड्र्यू आणि एडवर्ड स्कॉटलंडमधील अ‌ॅबरडीन विमानतळावर उतरले आणि बालमोरल कॅसलकडे निघाले. ड्यूक ऑफ केंब्रिज, ड्यूक ऑफ यॉर्क देखील सोबत आहेत.

आजारपणामुळे राणी बालमोरल पॅलेसमध्ये राहत होती. या राजवाड्यातून त्‍या सर्व कार्यालयीन कामे करत होत्‍या. ब्रिटनच्‍या नवीन पंतप्रधान लिझ ट्रस यांनी 6 सप्टेंबर रोजी येथे येऊन त्यांची भेट घेतली आणि शपथ घेतली होती.

राजघराणे आणि ब्रिटनमध्ये शोककळा

राणी एलिझाबेथचे पती प्रिन्स फिलिप यांचे 9 एप्रिल 2021 रोजी निधन झाले. आज दिनांक 8 सप्‍टेंबर 2022 रोजी राणीचे निधन झाले. राणीला चार मुले आहेत. प्रिन्स चार्ल्स, राजकुमारी ऍनी, अँड्र्यू आणि एडवर्ड, ज्यांच्यापासून त्‍यांना आठ नातवंडे आणि 12 पणतू आहेत. आता प्रिन्स विल्यम वयाच्या 40 व्या वर्षी ब्रिटीश सिंहासनाचे वारसदार बनले आहेत. त्याचे वडील प्रिन्स चार्ल्स आता राजा बनले आहेत.

राजघराण्यावर आता अधिकृतपणे शोक व्यक्त केला जाईल. सर्व अधिकृत कार्यक्रम रद्द केले जातील आणि शाही राजवाडे आणि घरांवर युनियन जॅक अर्ध्या मास्टवर फडकवला जाईल. याशिवाय ब्रिटनच्या सर्व बाह्य चौक्या आणि लष्करी तळांवरही अर्ध्‍यावर ध्वज फडकवला जाईल.

हे छायाचित्र राजघराण्याच्या अधिकृत वेबसाइटवर शेअर करण्यात आले आहे. यामध्ये राणीचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
हे छायाचित्र राजघराण्याच्या अधिकृत वेबसाइटवर शेअर करण्यात आले आहे. यामध्ये राणीचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख
पंतप्रधान मोदी यांनी आपल्‍या शोकसंदेशात म्‍हटले की, राणी एलिझाबेथ ह्या दिग्गज शासक होत्या. एलिझाबेथ द्वितीय आपल्या काळातील महान शासक म्हणून स्मरणात राहतील. त्यांच्या दु:खाच्या काळात त्यांचे कुटुंब आणि ब्रिटनच्या लोकांसोबत माझ्या संवेदना आहेत.

त्यांनी सांगितले की, मी राणीला 2015 आणि 2018 मध्ये यूके दौऱ्यात भेटलो. एका सभेत त्यांनी मला एक रुमाल दाखवला होता, तो रुमाला राणींना महात्मा गांधींनी त्यांच्या लग्नात भेट म्हणून दिला होता.

जागतिक नेत्यांनी व्यक्त केले दु:ख

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की, "राणीने ब्रिटीशांना ७० वर्षे स्थिरता दिली. राणीने लोकांवर एक अमिट छाप सोडली आहे, जी लोक नेहमी लक्षात ठेवतील."

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले की, 'राणी एलिझाबेथने कॅनडातील लोकांसाठी जे केले ते आम्ही कधीही विसरणार नाही.'

इस्राइलचे पंतप्रधान यार लॅपिड म्हणाले की, 'राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे नेतृत्व आणि सेवा जग नेहमीच लक्षात ठेवेल.'

बकिंगहॅम पॅलेसमधील ब्रिटीश राष्ट्रध्वज अर्ध्यापर्यंत खाली घेण्‍यात आला आहे.
बकिंगहॅम पॅलेसमधील ब्रिटीश राष्ट्रध्वज अर्ध्यापर्यंत खाली घेण्‍यात आला आहे.

लंडनच्या बकिंघम पॅलेसमध्ये होणारी गार्ड चेजिंग सेरेमनी रद्द करण्यात आली आहे. सेरेमनीवेळी ज्या ठिकाणी पर्यटक गोळा होतात, त्या ठिकाणी एक बोर्ड लावण्यात आला आहे.

बकिंघम पॅलेसवर लावण्यात आलेला साइन बोर्ड. येथेच उद्या पारंपरिक गार्ड चेजिंग सेरेमनी होणार होती.
बकिंघम पॅलेसवर लावण्यात आलेला साइन बोर्ड. येथेच उद्या पारंपरिक गार्ड चेजिंग सेरेमनी होणार होती.

तत्पूर्वी, महाराणींच्या प्रीव्ही काउंसिल म्हणजे गुप्त माहितीशी संबंधित मंत्रिमंडळाची व्हर्चुअल बैठकही रद्द करण्यात आली होती.

हे छायाचित्र रॉयटर्सने जारी केली आहे. स्कॉटलंडच्या बाल्मोरल कॅसल इमारतीच्या बाहेर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेत.
हे छायाचित्र रॉयटर्सने जारी केली आहे. स्कॉटलंडच्या बाल्मोरल कॅसल इमारतीच्या बाहेर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेत.
हे छायाचित्र 6 सप्टेबर म्हणजे 2 दिवसांपूर्वीचे आहे. तेव्हा ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान लिझ ट्रस महाराणींकडून शपथ घेण्यासाठी गेल्या होत्या. हा फोटो तेव्हा जारी करण्यात आला होता
हे छायाचित्र 6 सप्टेबर म्हणजे 2 दिवसांपूर्वीचे आहे. तेव्हा ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान लिझ ट्रस महाराणींकडून शपथ घेण्यासाठी गेल्या होत्या. हा फोटो तेव्हा जारी करण्यात आला होता

महाराणींच्या आयुष्याशी संबंधित महत्वाची छायाचित्रे...

एलिझाबेथ यांचा जन्म 21 एप्रिल 1926 रोजी लंडनमध्ये झाला. त्यांचे वडील अल्बर्ट ड्यूक ऑफ यॉर्क व आई एलिझाबेथ बोवेस-लियोन होत्या.
एलिझाबेथ यांचा जन्म 21 एप्रिल 1926 रोजी लंडनमध्ये झाला. त्यांचे वडील अल्बर्ट ड्यूक ऑफ यॉर्क व आई एलिझाबेथ बोवेस-लियोन होत्या.
हे छायाचित्र एलिझाबेथ यांचे आहे. तेव्हा त्या 2 वर्षांच्या होत्या. त्या अल्बर्ट व बोवेस-लियोन यांच्या पहिल्या अपत्य होत्या.
हे छायाचित्र एलिझाबेथ यांचे आहे. तेव्हा त्या 2 वर्षांच्या होत्या. त्या अल्बर्ट व बोवेस-लियोन यांच्या पहिल्या अपत्य होत्या.
4 वर्षीय एलिझाबेथ ऑलिंपियातील एका रॉयल स्पर्धेला गेल्या होत्या. हे छायाचित्र तेव्हाचे आहे. त्या अनेकदा ऑलिंपिया इंटरनॅशनल हॉर्स शोमध्ये जात असे.
4 वर्षीय एलिझाबेथ ऑलिंपियातील एका रॉयल स्पर्धेला गेल्या होत्या. हे छायाचित्र तेव्हाचे आहे. त्या अनेकदा ऑलिंपिया इंटरनॅशनल हॉर्स शोमध्ये जात असे.
हे चित्र एलिझाबेथ व त्यांच्या भगिणी मार्गारेट रोझचे आहे. मार्गारेटचा जन्म 1930 मध्ये झाला. दोघांचेही शिक्षण घरीच झाले.
हे चित्र एलिझाबेथ व त्यांच्या भगिणी मार्गारेट रोझचे आहे. मार्गारेटचा जन्म 1930 मध्ये झाला. दोघांचेही शिक्षण घरीच झाले.
14 वर्षीय प्रिन्सेस एलिझाबेथ यांनी रेडिओ कार्यक्रम चिल्ड्रेन्स अवरच्या माध्यमातून दुसऱ्या महायुद्धात ब्रिटन सोडावे लागलेल्या मुलांसाठी संदेश जारी केला होता.
14 वर्षीय प्रिन्सेस एलिझाबेथ यांनी रेडिओ कार्यक्रम चिल्ड्रेन्स अवरच्या माध्यमातून दुसऱ्या महायुद्धात ब्रिटन सोडावे लागलेल्या मुलांसाठी संदेश जारी केला होता.
एलिझाबेथ 1937 मध्ये गर्ल गाईड बनल्या. या फोटोमध्ये त्यांनी गर्ल गाईडचा गणवेश परिधान केला आहे. गर्ल गाईड ही सेवाभावी संस्था आहे.
एलिझाबेथ 1937 मध्ये गर्ल गाईड बनल्या. या फोटोमध्ये त्यांनी गर्ल गाईडचा गणवेश परिधान केला आहे. गर्ल गाईड ही सेवाभावी संस्था आहे.
एलिझाबेथ यांनी 20 नोव्हेंबर 1947 रोजी ग्रीसचे युवराज फिलिप यांच्याशी लग्न केले. फिलिप ग्रीस व डेन्मार्कचे प्रिन्स अँड्र्यू व बॅटनबर्गची राजकुमारी अॅलिस यांचे एकुलते एक अपत्य होते.
एलिझाबेथ यांनी 20 नोव्हेंबर 1947 रोजी ग्रीसचे युवराज फिलिप यांच्याशी लग्न केले. फिलिप ग्रीस व डेन्मार्कचे प्रिन्स अँड्र्यू व बॅटनबर्गची राजकुमारी अॅलिस यांचे एकुलते एक अपत्य होते.
हे छायाचित्र राणी एलिझाबेथ द्वितीय व त्यांचे पती फिलिपचा आहे. ते 2 जून 1953 रोजी बकिंघम पॅलेसमध्ये राणीच्या राज्याभिषेकाच्या वेळी किंवा मुकुटारोहणावेळी घेण्यात आले होते.
हे छायाचित्र राणी एलिझाबेथ द्वितीय व त्यांचे पती फिलिपचा आहे. ते 2 जून 1953 रोजी बकिंघम पॅलेसमध्ये राणीच्या राज्याभिषेकाच्या वेळी किंवा मुकुटारोहणावेळी घेण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...