आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या कोविशील्ड या लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भारतात लसीकरण सुरू होण्याची अपेक्षा वाढली आहे. देशात ऑक्सफर्डच्या लसीचे उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट करत आहे. बुधवारी तज्ज्ञ समितीसमोर सीरम आणि भारत बायोटेक लसीच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंतचा डेटा सादर करण्यात आला. समिती त्याचा १ जानेवारीला आढावा घेईल. त्याच दिवशी लसीला मंजुरी मिळू शकते, अशी चर्चा आहे. सीरमने लसीचे ६ कोटी डोस तयार केले आहेत. फेब्रुवारीपर्यंत आणखी १० कोटी डोस तयार होतील. मंजुरी मिळताच पुरवठा सुरू होईल. आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस मिळेल. ज्या राज्यांत आरोग्य कर्मचारी जास्त असतील तेथे जास्त डोस दिले जातील. दुसरीकडे, देशात कोरोनाच्या नव्या स्वरूपाच्या रुग्णांची संख्या २० झाली आहे. सरकारने ब्रिटनला जाणाऱ्या-येणाऱ्या उड्डाणांवरील बंदी ७ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. तसेच इतर व्यावसायिक उड्डाणांवरील बंदी ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवली आहे.
नववर्षात अशा प्रकारे राबवली जाणार देशाची सर्वात मोठी लसीकरण माेहीम
- पहिल्या टप्प्यात सुमारे ३० कोटी नागरिकांना लस देण्यात येईल. लसीकरण अभियानात को-विन (Co-WIN) मोबाइल अॅप आणि वेबसाइटचा होणार वापर.
- को-विनवर नोंदणीसाठी मतदान ओळखपत्रासह १२ ओळखपत्रे वैध असतील. नोंदणी केलेल्यांनाच लस टोचली जाईल. एेनवेळी नोंदणी केली जाणार नाही.
- नोंदणी केलेल्या व्यक्तीला एसएमएसद्वारे माहिती मिळेल. प्रत्येक बूथवर दिवसाला १०० जणांना लस दिली जाईल. तसेच प्रतीक्षालयाची सुविधा असलेल्या ठिकाणी २०० जणांना लस देण्याची तयारी आहे.
- सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी
लोकांच्या मनातील प्रश्न- लस केव्हा मिळेल?... जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
- जर कोरोना ड्यूटीत फ्रंटलाइन वर्कर उदा. डॉक्टर, नर्स, आशा वर्कर आदी असाल तर...
तुम्हाला सर्वात आधी लस मिळेल. राज्यांनी ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत या सर्वांचा डेटा केंद्र सरकारकडे सोपवायचा आहे. देशात फ्रंटलाइन वर्करची संख्या एक कोटी.
- पोलिस, लष्कर, महापालिका यांसारख्या एखाद्या आवश्यक सेवेत असाल तर...
तुम्हालाही लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातच लस मिळेल. पण आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाल्यानंतर.
- तुमचे वय ५० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे आणि अस्थमा, हृदयरोग, मधुमेह असेल तर...
तुम्हाला आरोग्य कर्मचारी, आवश्यक सेवेत तैनात लोकांनंतर लस मिळेल. लसीची पहिली वा दुसरी खेप तुमच्यासाठीच असेल.
- तुम्ही कंटेनमेंट झोनमध्ये राहत असाल तर...
तुम्हाला आरोग्य कर्मचारी, आवश्यक सेवा आणि ज्येष्ठ तसेच गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनंतर लस दिली जाईल.
जे वरील श्रेणींपैकी कोणत्याही श्रेणीत नाहीत, त्यांनाही लस मिळेल. लसीची उपलब्धता वाढल्यानंतर लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते.
जागरूकतेसाठी राष्ट्राध्यक्षांच्या लसीकरणाचा लाइव्ह शो
- जगात अनेक राष्ट्राध्यक्ष आणि तज्ञ लस टोचून घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत. लोकांच्या मनात लसीच्या सुरक्षेबाबत संशय निर्माण हाेऊ नये, हा यामागील हेतू होता. यामध्ये सहभागी आहेत...
- अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस, मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. अँथनी फॉसी यांनी लाइव्ह शोमध्ये लस घेतली. इस्रायलचेे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांनीदेखील आधी लस घेतली.
ब्रिटनमध्ये आता दोन लसी, कोविशील्डच्या आधी फायझरला होती वापराची परवानगी
कोविशील्ड : २ डोस|२०,२६० लोकांवर चाचणी
- ब्रिटनमध्ये ८ डिसेंबरला लसीकरणास सुरुवात. फायझरचे ६,२५,९८१ डोस देण्यात आले आहेत.
- जगात ५१ लाखांहून जास्त लाख डोस देण्यात आले आहेत. अमेरिकेत २३,२०,३७९१ डोस दिले.
कोविशील्ड लस १०० टक्के सुरक्षित
गंभीर प्रकृतीमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांसाठीही आमची लस १००% सुरक्षित आहे. पास्कल सोरियोट, सीईओ, अॅस्ट्राझेनेका
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.