आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Decision To Conduct RT PCR Testing Of Wastewater Samples For The First Time In India, Tests In 50 Cities

सांडपाण्याच्या नमुन्यांतून संसर्ग तपासणार:भारतात प्रथमच सांडपाण्याच्या नमुन्यांच्या आरटी-पीसीआर चाचणीचा निर्णय, 50 शहरांत चाचण्या

नवी दिल्ली / पवन कुमार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या भागातील वस्तीत कोरोना विषाणू संसर्ग किती आहे, तो कुठवर फैलावला आहे, याची माहिती घेण्यासाठी देशात प्रथमच सांडपाण्याच्या नमुन्यांच्या तपासणीची तयारी होत आहे. देशातील सर्वच राज्यांच्या राजधान्यांसह ५० पेक्षा जास्त प्रमुख शहरांत लवकरच त्या सुरू होतील. नाल्यांतील नमुन्यांची लॅबमध्ये आरटी-पीसीआर चाचणी केली जाईल. यामुळे त्या भागात संसर्ग आहे की नाही, त्याची पातळीही कळू शकेल. कोविड-१९ नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनचे (एनटागी) चेअरमन प्रो. एन.के. अरोरा म्हणाले, ज्या भागात लोक तपासण्या करत नाहीत तेथे संसर्ग किती आहे, हे त्यातून कळेल. इंडियन साॅर्स-कोव्ह-२ जीनोमिक्स कन्सोर्टियमचे माजी प्रमुख प्रो. शाहिद जमील म्हणाले, यामुळे सिरो सर्व्हेसाठी नमुने घेण्याची गरज भासणार नाही. वेळ, पैसा आणि मनुष्यबळाचीही बचत होईल.

लक्षणांआधी सांडपाण्यातून मिळतात संकेत, देशात फायदा कमी कारण भोपाळच्या ६%, जयपूरच्या ११% सांडपाण्यावरच प्रक्रिया : डॉ. क्रिस्टॉफ ओर्ट वेस्ट वाॅटर एपिडिमिओलॉजिस्ट, स्वित्झर्लंड व भारताच्या पर्यावरण मंत्रालयाचा अहवाल

नाल्यांची तपासणी आवश्यक आहे का?
नाल्या कधी खोटे बोलत नाहीत. तुम्ही जे खाता-पिता, त्याचा अंश शरीरातील मलमूत्रात असताे. नाल्यांच्या नमुन्यांच्या तपासणीतून त्यात असलेले बॅक्टेरिया, विषाणू, औषधांचे अवशेष आणि आरोग्याचे आकलन करू शकता.

आधी असे झाले आहे का?
कोविड-१९ च्या आधी नाल्यांच्या तपासणीतून बेकायदेशीर ड्रग्जचा वापर कुठे होत आहे, हे तपासले जात होते.

जगात असे कुठे होत आहे का?
स्वित्झर्लंडमध्ये पहिला कोविड-१९ रुग्ण आढळल्यानंतर विभागीय संसर्ग तपासण्यासाठी नाल्यांची तपासणी सुरू केली होती. अमेरिका, नेदरलँडमध्येही या प्रक्रियेचा अवलंब करण्यात येत आहे.

कोरोनात ती कशी प्रभावी आहे?
व्यक्ती संक्रमित झाल्यास आजाराची लक्षणे दिसण्याच्या काही दिवस आधी विषाणूचे संकेत मलमूत्रात आढळतात. चाचणी निगेटिव्ह आल्याच्या ४ आठवड्यांपर्यंत संसर्ग शरीरात राहतो.

तिचा वापर कुठे होऊ शकतो?
सांडपाणी व्यवस्थापनाची चांगली व्यवस्था असलेल्या देशांत सामुदायिक तपासणी शक्य आहे.

सांडपाणी तपासणीचा फायदा काय?
संपूर्ण देशाऐवजी एका विशिष्ट भागात लॉकडाऊन लावला जाऊ शकतो. त्यामुळे अर्थव्यवस्थाही सुरू राहील.

सांडपाण्याचे नमुने घेणे केव्हा उपयुक्त?
कोराेना विषाणू सांडपाण्यात दोन दिवस जिवंत राहतो. यादरम्यान मलनिस्सारण प्रक्रियेविना तलाव वा नदीत पोहोचल्यास १० दिवस जिवंत राहू शकतो.

भारतात सांडपाण्याद्वारे कोरोनाची ओळख पटवणे शक्य आहे का?
पर्यावरण मंत्रालयाच्या ईएनव्हीआयएस सेंटरच्या एप्रिल २०२१ च्या आकड्यांनुसार भारतात रोज ७२,३६८ एमएलडी सांडपाणी निघते. त्यापैकी ३१,८४१ एमएलडीचीच प्रक्रिया शक्य आहे. २६,८६९ एमएलडी क्षमतेचे ट्रीटमेंट प्लांटच सुरू आहेत. म्हणजे सुमारे ६३% सांडपाणी प्रक्रियेविनाच वाहत आहे.

भारतातील किती शहरांत सांडपाण्याच्या पूर्ण पाण्याच्या प्रक्रियेची व्यवस्था आहे?
उपलब्ध आकड्यांनुसार, ४ शहरांत (हैदराबाद, वडोदरा, लुधियाना, चेन्नई) १००% सांडपाणी प्रक्रिया क्षमता आहे. बंगळुरू आणि अमृतसरसारख्या ११ शहरांचा डेटा नाही. ६०% च्या वरील क्षमतेची ४ शहरे (अहमदाबाद ९६%, मुंबई ८०%, दिल्ली ६१%, पुणे ६४%) आहेत. इतर शहरांत क्षमता ५०% पेक्षा कमी आहे. सर्वात खाली आहेत- भोपाळ (६%), लखनऊ (११%) आणि जयपूर (११%).

बातम्या आणखी आहेत...