आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पीपीएफसारख्या सर्व अल्पबचत योजनांवरील व्याजदर १.१%पर्यंत घटवण्याचा निर्णय सरकारने १२ तासांतच मागे घेतला. नवीन व्याजदर १ एप्रिल, गुरुवारपासून सुरू होणाऱ्या तिमाहीत लागू होणारे होते. त्याचा आदेशही बुधवारी रात्री ८ वाजता जारी झाला. मात्र गुरुवारी सकाळी ७:५४ वाजताच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तो आदेश मागे घेण्याची घोषणा सोशल मीडियावर केली.
त्या म्हणाल्या, ‘व्याजदर कपातीचा आदेश चुकीने जारी झाला होता. भारत सरकारच्या बचत योजनांवरील व्याजदर २०२०-२१ च्या मार्च तिमाहीप्रमाणेच कायम राहतील. नवा आदेश मागे घेतला जात आहे.’ त्यावर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा म्हणाल्या, ‘सरकारने सर्वसामान्यांसाठीच्या अल्पबचत योजनांवरील व्याजदरात मोठी कपात केली होती. सरकारला सकाळी जाग येताच उमगले की... अरे सध्या तर निवडणुकांचा हंगाम सुरू आहे.’
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.