आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Decrease In More Than 13,000 Active Cases In One Day, The Highest In The Last 19 Days

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:एका दिवसात 13 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह केसमध्ये घट, हे गेल्या 19 दिवसांमध्ये सर्वात जास्त

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत 1.03 कोटी संक्रमित आढळले आहेत.

देशात कोरोना संक्रमितांच्या आकड्यांमध्ये पुन्हा एकदा मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये केवळ 16 हजार 278 नवीन संक्रमित आढळले आहेत. तर 29 हजार 209 रुग्ण बरे झाले आहेत. 200 लोकांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे अॅक्टिव्ह केस म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 13 हजार 140 ची घट झाली. 16 डिसेंबरच्या नंतर ही सर्वात मोठी घसरण आहे. तेव्हा 15 हजार 569 अॅक्टिव्ह केस कमी झाल्या होत्या.

देशात आतापर्यंत 1.03 कोटी संक्रमित आढळले आहेत. यामधून 99.75 लाख बरे झाले आहेत. तर 1.49 लाख लोकांनी या महामारीमध्ये जीव गमावला आहे. हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत.

महाराष्ट्रात सोमवारी 2765 नवीन केस आढळल्या. यामधून 10 हजार 362 लोक बरे झाले आहेत आणि 29 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 19 लाख 47 हजार 11 लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यामधून 18 लाख 47 हजार 361 लोक बरे झाले आहेत. तर 49 हजार 695 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता 48 हजार 801 रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...