आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना विषाणूच्या नवीन रूण्यांमध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासांत मध्ये कोरोना विषाणूचे एक हजार 761 नवीन रुग्ण आढळले असून या मध्ये 127 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान काल 2 हजार 75 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यामध्ये 71 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 7 हजार 841 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जाणून घ्या देशातील कोरोनाची सध्याची स्थिती काय आहे.
सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 26 हजार 240 इतकी कमी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल देशात 3 हजार 196 लोक बरे झाले होते, त्यानंतर सक्रिय प्रकरणांची संख्या 26 हजार 240 वर आली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 16 हजार 479 झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 65 हजार 122 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
आतापर्यंत नागरिकांना 181 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत.
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत अँटी-कोरोनाव्हायरस लसींचे 181 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. काल 15 लाख 34 हजार 444 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत 181 कोटी 27 लाख 11 हजार 675 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 2 कोटींहून अधिक (2,17,33,502) प्रतिबंधात्मक लस देण्यात आल्या आहेत. देशात कोविड विरोधी लसीकरण मोहीम 16 जानेवारी 2021 पासून सुरू झाली आणि पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. त्याचवेळी, कोरोना योद्ध्यांसाठी लसीकरण मोहीम २ फेब्रुवारीपासून सुरू झाली.
तिसरी लाट जवळपास ओसरली, तरीही बेफिकिरी नको
चीनने झीरो कोरोना ट्रान्समिशन पॉलिसी लावली होती. आपल्याकडे संसर्ग असलेला परिसर तेवढा सील करीत होते. जगभर जहाज, विमान वाहतूक सुरू असते. त्यामुळे संसर्ग पसरू न देणे सध्याच्या घडीला कठीण आहे. हे लक्षात घेता प्रत्येकाने काळजी घेणे हेच चांगले, असे गंगाखेडकर यांनी सांगितले.
पद्मश्री डॉ.रमण गंगाखेडकर यांचे मत
संसर्गामुळे इम्युनिटी ९ ते १२ महिने राहू शकते. भारतीयांना त्याचे संरक्षण आहे. हायब्रिड इम्युनिटी रुग्णालयात भरती होणे कमी करते. तसेच तीव्र कोरोनाचे आजार व मृत्यूची शक्यता कमी करते व ओमायक्रॉन या विषाणुमध्ये हे स्पष्ट दिसून आले आहे. भारतातून तिसरी लाट ओसरली आहे. तरीही बेफिकीर राहाता कामा नये, अशी काळजी पद्मश्री डॉ.रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.