आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Har Ghar Tiranga | Deduction Of Rs 38 Each From The Salary Of Railway Employees For The Tricolor Flag

हर घर तिरंगा:तिरंगा ध्वजासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वेतनातून प्रत्येकी 38 रुपये कपात, कर्मचारी संघटनेचा आक्षेप; यावर विचार केला पाहिजे

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय रेल्वे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आपल्या कर्मचाऱ्यांना तिरंगा झेंडे वितरित करणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून प्रत्येकी ३८ रुपयांची कपात केली जाणार आहे. यावर कर्मचारी आणि कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, आम्हाला ३८ रुपयांत दिल्या जाणाऱ्या झेंड्याची किंमत भाजप कार्यालयात २० रुपये, मुख्य डाकघरमध्ये २५ रुपये आहे.

तर स्वयंसहाय्यता बचत गट हेच झेंडे २० रुपयांत देत आहेत. उत्तर-मध्य रेल्वे कर्मचारी संघटनेचे मंत्री चंदन सिंह म्हणाले, रेल्वे कर्मचारी आपल्या पैशांतून तिरंगा ध्वज खरेदी करणार आहेत. त्यांच्यावर हा निर्णय थोपवणे चुकीचे आहे. रेल्वेने यावर विचार केला पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...