आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Deep Sidhu Death | Deep Sidhu Accident | Marathi News | Accidental Death Of Punjabi Actor Deep Sidhu; Accused Of Car Accident Near Sonipat, Delhi Violence

मोठी बातमी:पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा अपघातात मृत्यू; सोनीपतजवळ कार अपघात, दिल्ली हिंसाचाराचा होता आरोपी

सोनीपत6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचे अपघाती निधन झाले आहे. KMP द्रुतगती मार्गावर सोनीपतजवळ हा अपघात झाला आहे. सिद्धू आपल्या मित्रांसह दिल्लीहून पंजाबला परतत होता. तो स्वत: स्कॉर्पिओ गाडी चालवत होता. त्याचदरम्यान अपघात झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान दीप सिद्धू चर्चेत आला होता. दिल्लीतील शेतकरी ट्रॅक्टर रॅली दरम्यान 26 जानेवारी 2021 रोजी लाल किल्ल्यावर हिंसाचार भडकवण्याचा त्यावर आरोप होता.

या अपघातानंतर दीप सिद्धू याचा मृतदेह खरसौदा रुग्णालयामध्ये ठेवण्यात आला होता. या अपघाताची माहिती मिळताच दीप सिद्धूचे अनेक चाहत्यांनी त्याच्या निधनामुळे दुःख व्यक्त केले. दीप सिद्धू हा शेतकरी आंदोलनावेळी चर्चेत आला होता. दिल्लीतील लाल किल्ल्यामध्ये घडलेल्या प्रकरणातही तो आरोपी होता. त्यानंतर त्याला जामीन मिळाला होता.

अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला

तपासासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान हा अपघात झाल्याचे सांगितले. अपघाताच्या वेळी दीप सिद्धू स्वतः स्कॉर्पिओ चालवत होता आणि त्याच्यासोबत एक एनआरआय मित्रही होता. अपघातादरम्यान ट्रक आणि कारची धडक इतकी जोरदार होती की, कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात दीप सिद्धूचा जागीच मृत्यू झाला असून, ट्रकचालक फरार झाला आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, स्कॉर्पिओ चालवत असताना अचानक दीप सिद्धू यांना तेथे एक ट्रॉली उभी असल्याचे दिसले. ट्रॉलीला धडकू नये म्हणून त्याने कार वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याची कार चालकाच्या बाजूने ट्रॉलीच्या मागे जाऊन धडकली. दीप सिद्धू स्वतः कार चालवत होता, त्यामुळे अपघातावेळी त्याचा मृत्यू झाला. मात्र, पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास करण्याचे ठरवले आहे.

दिल्ली हिंसाचारानंतर सिद्धू आला होता चर्चेत

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीत सीमा आंदोलन आणि त्यानंतर लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारात दीप सिद्धूचे नाव चर्चेत आले होते. पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्यात एप्रिल 1984 मध्ये जन्मलेल्या दीप सिद्धूने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. कायद्याचा सखोल अभ्यास केला. तो किंगफिशर मॉडेल हंटचा विजेता होता. तसेच मिस्टर इंडिया स्पर्धेत मिस्टर पर्सनॅलिटीचा किताबही त्याने पटकावला होता. त्याचा पहिला पंजाबी चित्रपट 'रमता जोगी' 2015 साली प्रदर्शित झाला होता. तथापि, दीप 2018 च्या जोरा दास नंबारिया चित्रपटाने प्रसिद्ध झाला, ज्यामध्ये त्याने एका गुंडाची भूमिका केली होती.

बातम्या आणखी आहेत...