आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Deepak, The Accused In Museva's Murder Case, Absconded From The Police Custody, Gave A Hoot While Being Taken To The Court.

गँगस्टर फरार:मुसेवाला हत्याकांडातील आराेपी दीपकचे पाेलिस काेठडीतून पलायन, कोर्टात नेत असताना दिली हुलकावणी

चंदीगड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपी गँगस्टर दीपक टिनू पंजाबच्या मानसा जिल्ह्यात पोलिसाच्या ताब्यातून फरार झाला. शनिवारी रात्री गाेइंदवाल साहिब तुरुंगातून एका अन्य प्रकरणात स्थानिक न्यायालयात हजर करण्यासाठी नेताना तो पळाला.

दीपक टिनू गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा निकटवर्तीय मानला जातो. मुसेवाला हत्या प्रकरणात बिश्नोई प्रमुख आरोपी आहे. भटिंडा विभागाचे आयजी मुखविंदरसिंग छिना म्हणाले, पोलिसांचे पथक त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

पंजाबच्या डीजीपींनी सोशल मीडियाला सांगितले की, दीपक टिनू फरार झाल्याप्रकरणी पोलिस अधिकारी प्रीतपालसिंगला अटक करून निलंबित केले आहे. त्यांना नोकरीतून बडतर्फ केले जात आहे. मानसा जिल्ह्यात २९ मे रोजी गायक मुसेवालाची गोळी झाडून हत्या केली होती.

बातम्या आणखी आहेत...