आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मानहानी प्रकरण ; सुरत सेशन कोर्टात उद्या अपील करणार राहुल

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानहानीच्या खटल्यात शिक्षा झाल्यामुळे लोकसभेचे सदस्यत्व गमावल्यानंतर ११ दिवसांनी राहुल गांधी सोमवारी अपील दाखल करणार आहेत. पक्षाची लिगल टीम गुजरातमध्ये पोहोचत आहे. हायकोर्टापूर्वी सुरत न्यायालयात अपील केले जाणार आहे. काँग्रेसमध्ये जामीन घ्यावा की कारागृहात जावे, यावर दुमत होते. शेवटी राजकीय आणि कायदेशीर अशा दोन्ही मैदानांवर लढाई लढण्याचे ठरले. अपिलामागील उशिरासाठी गुजरातीतील निर्णय इंग्रजीत भाषांतरित करण्यासाठी वेळ लागत अाहे, हे कारण सांगण्यात येत आहे. निर्णयाला आव्हान द्यावे की कारागृहात जावे या मुद्द्यांवर पक्ष नेतृत्वांत दुमत होते. कारागृहात गेल्यास सहानुभूतीची लाट येईल, असे एक मत होते. तर आव्हान न देणे म्हणजे चुकी मान्य करणे, असा होईल, असे दुसरे मत होते.