आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Liz Truss Becomes The New British Prime Minister, Succeeds Ousted Boris Johnson; Defeats Rival Rishi Sunak

ब्रिटनच्या तिसऱ्या महिला PM लिझ ट्रस:भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचा पराभव; क्वीन एलिझाबेथ कार्यकाळातील 15व्या पंतप्रधांना शपथ देतील

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

47 वर्षीय लिझ ट्रस ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान असतील. त्यांनी भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचा पराभव केला. लिझ आता बोरिस जॉन्सन यांची जागा घेतील. लिझ यांना ब्रिटिश राजकारणातील फायरब्रँड नेत्या म्हणून ओळखले जाते. दोन महिने चाललेल्या निवडणूक प्रचारात त्यांचा दृष्टिकोन बचावात्मक नव्हता. वेळापत्रकानुसार, नवे पंतप्रधान निकाल जाहीर झाल्यानंतर लवकरच डाऊनिंग स्ट्रीटजवळ एक छोटेसे भाषण करतील. ही केवळ एक परंपरा आहे.

लिझ या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. त्यांच्या आधी मार्गारेट थॅचर आणि थेरेसा मे यांनी हे पद भूषवले आहे. लिझ मार्गारेट थॅचर यांना त्यांचा आदर्श मानतात.

कोणाला किती मते मिळाली

लिज ट्रस : 81,326
ऋषी सुनक : 60,399
एकूण मते : 172,437
एकूण मतदान : 82.6%
नाकारलेली मते: 654

बोरिस जॉन्सन यांनी 7 जुलै रोजी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, कंझर्व्हेटिव्ह पक्षात त्यांची लढत भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांच्याशी होती. पक्षाच्या सुमारे 1.60 लाख सदस्यांनी मतदान केले.

हा विजय का खास आहे?

कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या खासदारांच्या मतदानाच्या पाच फेऱ्यांमध्ये सुनक यांनी लिझ ट्रस यांचा पराभव केला होता, परंतु अंतिम निर्णय या पक्षाच्या सुमारे 1 लाख 60 हजार नोंदणीकृत सदस्यांनी घेतला आहे. लिझ यांनी ते जिंकले. बोरिस जॉन्सनदेखील सुनक यांच्या बाजूने नव्हते.

हरणे अजिबात आवडत नाही

जेव्हा लिझ 7 वर्षांची होत्या, तेव्हा त्यांनी शाळेच्या नाटकात त्यांच्या आदर्श असलेल्या आयर्न लेडी माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांची भूमिका केली होती. लिझ यांचा भाऊ एका मुलाखतीत म्हणाला होता –तिला लहानपणापासूनच पराभवाचा तिटकारा आहे. मला आठवतं, आम्ही लहानपणी खेळायचो तेव्हा कुठेही हरू नये म्हणून ती मधूनच निघून जायची. तथापि, वयाबरोबर तिने उणिवांवर मात केली.

मंगळवारी म्हणजेच 6 सप्टेंबर रोजी नवीन पंतप्रधानांची शपथ

  • मंगळवार, 6 सप्टेंबर रोजी, जॉन्सन पंतप्रधान म्हणून आपले शेवटचे भाषण पीएम हाऊस 10 डाउनिंग स्ट्रीटवरून देतील. त्यानंतर राणीकडे आपला राजीनामा सुपूर्द करण्यासाठी स्कॉटलंडमधील अबर्डीनशायर येथे जाईल. सध्या, राणी एलिझाबेथ येथे आहेत. 96 वर्षीय एलिझाबेथ यांना चालताना त्रास होतो, म्हणून जॉन्सन आणि लिझ दोघेही त्यांच्याकडे जातील. सहसा हे काम बकिंगहॅम पॅलेसमध्ये केले जाते.
  • जॉन्सन जेव्हा राणीकडे राजीनामा सादर करतील तेव्हा लिझ राणीला भेटतील. पारंपरिकपणे या भेटीला 'किसिंग हँड्स' सेरेमनी म्हणतात. मात्र, यावेळी राणीची प्रकृती खालावल्याने हा सोहळा प्रतीकात्मक असेल. स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे हा शपथविधी सोहळा होणार आहे.
  • अधिकृत नियुक्ती होताच नवे पंतप्रधान लंडनला परततील. येथे 10 डाऊनिंग स्ट्रीटवरून नवीन पंतप्रधानांचे पहिले भाषण होईल.
  • लंडनच्या वेळेनुसार दुपारी चारच्या सुमारास भाषण केल्यानंतर पंतप्रधान नवीन मंत्रिमंडळाची नियुक्ती करतील. राणी झूम कॉलवर मंत्र्यांना शपथ देतील. त्यांचे विभागप्रमुख मंत्र्यांना 'सील किंवा मोहोर' देण्याचा विधी पूर्ण करतील.
  • नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक बुधवारी (7 सप्टेंबर) होणार आहे. यानंतर पंतप्रधान पहिल्यांदा सभागृहात (हाउस ऑफ कॉमन्स) पोहोचतील.

विदेशमंत्री होत्या लिज, भारत-ब्रिटन संबंध चांगलेच राहतील

सुनक यांच्याऐवजी लिज पंतप्रधान बनणे भारतासाठी फायदेशीर ठरेल. लिज विदेशमंत्री हेत्या. दोन्ही देशांचे संबंध नव्या उंचीवर नेण्यास साह्यकारी ठरल्या आहेत. यामुळे संबंध चांगलेच राहतील अशी अपेक्षा आहे. अलीकडच्या वर्षांतील पंतप्रधानांनी भारताकडे लक्ष दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...