आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Defence Minister At Indo China Border : Rajnath Singh Performs ‘Shastra Puja’ At Sukna War Memorial In Darjeeling

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीन सीमेवर संरक्षण मंत्री:राजनाथ सिंह यांनी केले शस्त्रपूजन, म्हणाले - सैन्य कोणालाही आपली एक इंच जमीनही घेऊ देणार नाही

दार्जिलिंगएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनसोबतचा सीमावादावर सुरू असलेला तणाव संपला पाहिले अशी भारताची इच्छा - राजनाथ सिंह

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विजयादशमीच्या निमित्ताने दार्जिलिंगमधील सुकना युद्ध स्मारकात शस्त्र पूजन केले. यावेळी ते म्हणाले की, चीनसोबतचा सीमावादावर सुरू असलेला तणाव संपला पाहिले अशी भारताची इच्छा आहे. या भागात शांती कायम राहावी. आपले सैन्य आपल्या जमिनाचा एक इंचाही भाग कोणाला देणार नाही असा मला विश्वास आहे. याआधी रविवारी सकाळी त्यांनी नाथू ला पास येथे येऊन दसर्‍याच्या दिवशी सैनिकांच्या शुभेच्छा दिल्या.

संरक्षण मंत्री पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत लष्करप्रमुख मनोज नरवणे देखील उपस्थित होते. राजनाथ यांनी सकाळी ट्विटरद्वारे देशवासियांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, भारतीय सेनेच्या जवानांशी भेट घेतल्यास मला खूप आनंद होते. त्यांचे मनोबल उंचावले गेले आहे. त्यांचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे. राजनाथ यांनी शनिवारी दार्जिलिंगच्या सुकना येथील 33 कोरच्या मुख्यालयाचा दौरा पूर्ण करून पूर्व क्षेत्रातील सैन्याच्या तयारीचा आढावा घेतला होता.

'सैनिकांचे धाडस सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल'

संरक्षण मंत्री म्हणाले की, लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर जे काही झाले आणि आपल्या जवानांनी ज्याप्रकारे शौर्याने प्रत्युत्तर दिले, इतिहासकार आपल्या जवानांची ती वीरता आणि साहला सुवर्ण अक्षरात लिहितील.

15 जून रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चिनी सैन्यामध्ये हिंसक झडप झाली होती. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते. चीनचे 40 पेक्षा जास्त सैनिक ठार झाले होते. सीमेवरील तनाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये 7 वेळा चर्चा झाली आहे. लडाखमध्ये चिनी सैन्याशी लढा देण्यासाठी भारताने सुमारे 60,000 सैनिक तैनात केले आहेत.