आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशियन सैन्याने युक्रेनच्या लुहान्स्क-डोनेत्स्क (डॉनबॉस क्षेत्र) या दोन प्रांतात प्रवेश केला आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी 13 तासांपूर्वी (भारतीय वेळेनुसार रात्री 3 वाजता) युक्रेनच्या या दोन राज्यांना स्वतंत्र देश म्हणून घोषित केले होते. यानंतर रशियन सैन्याचे रणगाडे या भागांकडे सरकत आहेत. दरम्यान असे रशिया-युक्रेन तणावावर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध झाले तर हा मुद्दा दोन-तीन देशांचा राहणार नाही. असे भाष्य राजनाथ सिंह यांनी केले आहे.
युक्रेन आणि रशिया देशात गेल्या काही दिवसांपासून तणाव सुरू आहे. रशियन सैन्याने युक्रेनच्या लुहान्स्क-डोनेत्स्क या दोन प्रांतात प्रवेश देखील केला आहे. त्यामुळे युद्धपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. असे असताना राजनाथ सिंह यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध झाले तर हा मुद्दा दोन-तीन देशांचा राहणार नाही, युक्रेन वादावर चर्चेतून तोडगा काढावा, अशी भारताची भुमिका आहे. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी एकमेकांशी चर्चा करुन वाद मिटवावा. असे आपले मत असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
पुढे राजनाथ सिंह म्हणाले की, दोन्ही देशात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. युद्धामुळे निर्माण झालेला तणाव सध्याच्या जागतिक परिस्थितीसाठी योग्य नाही. युद्ध झाल्यास हा मुद्दा दोन-तीन देशांपूरताच मर्यादीत नसणार आहे. आमच्या माहितीनुसार अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि रशिया अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात चर्चेचा मार्ग खुला होत आहे. दोन्ही नेत्यांमध्ये लवकरच चर्चा होणार आहे. अध्यक्ष बायडन यांनी चर्चेला सहमती दर्शवली आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. बायडन आणि पुतीन यांच्यात चर्चा होऊ शकते. पण रशियाने युक्रेनवर हल्ला करू नये सोमवारी व्हाईट हाऊसने घातली असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.
दरम्यान शेजारील देश पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान येत्या 23 फेब्रुवारीला रशिया दौऱ्यावर जात आहेत. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा दोन दशकातील हा पहिलाच रशिया दौरा आहे. इम्रान खान यांच्या रशिया भेटीने काहीच फरक पडणार नाही. भारताला युद्ध नकोय शांतता हवी आहे. भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी युक्रेनमधील भारतीय दूतावासाने एक सूचना जारी केला असून, सर्व भारतीयांना परत आणले जात आहेत. असे राजनाथ सिंह म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.